Friday , April 17 2026
Breaking News

निपाणी

सौंदलगा येथे शिगावे मळ्यानजीक अपघातात दहा ते पंधरा ऊसतोड मजूर जखमी

सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्गावरील शिगावे मळ्या नजीक ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन अपघात झाला. त्यात १० ते १५ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (ता.१४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. ट्रॅक्टर चालक फरारी झाला आहे. याबाबत …

Read More »

राहुल जारकीहोळी यांची निपाणीस भेट

निपाणी (वार्ता): कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमीटीचे कार्याध्यक्ष व यमकनमर्डी मतदारासंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुजय पाटील यांनी निपाणी येथील लाफायट हॉस्पीटल समोरील “ओम”ताक व लस्सी सेंटरला भेट दिली. शिवाय येथील ताक व लस्सीचा आनंद लुटला. तसेच राहुल जारकीहोळी यांनी निपाणी भागातील …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांने जोपासला तलाव स्वच्छतेचा वसा!

सलग चौथ्या वर्षी उपक्रम : तलावाच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ  निपाणी (वार्ता) : येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलाव परिसरात पावसाळ्यातील पाणी ओढ्यामार्गे तलावात येते. पण काही वर्षांपासून पाणी येणाऱ्या मार्गावर काटेरी झाडांसह टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या. त्यामुळे पावसाचे ओढ्यामार्गे तलावात पाणी येण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात …

Read More »

अभियंत्याकडून गाव, देश सुंदर बनवण्याचे काम

काडसिद्धेश्वर स्वामी : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगच्या समुदाय भवनाचे भूमिपूजन निपाणी (वार्ता) : कोणतेही बांधकाम पूर्ण करणे सोपे नसते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्या दूर करून बांधकाम पूर्ण होत असते. अभियंत्यांच्याजवळ हे कौशल्य असून त्यांच्या हातून गाव आणि देश सुंदर बनविले जाते, असे मत कनेरी मठातील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी …

Read More »

व्यंकटेश्वरा कारखान्याचे विक्रमी ऊस उत्पादनाचे हंचिनाळला चार पुरस्कार

विक्रमी उत्पादनाचा पितापुत्रांनी केला विक्रम हंचिनाळ : वेंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट या ऊस कारखान्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विक्रमी ऊस उत्पादनामध्ये 2020-21 या सालाकरिता दिलेल्या पुरस्कारांमध्ये हंचिनाळ येथील चार शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादनाचे अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल कारखान्यामार्फत त्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल, श्रीफळ देऊन कारखान्याचे चेअरमन महादेवराव महाडिक, कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, अमल महाडिक यांच्या …

Read More »

नरसिंगपूरनजिक इनोव्हाची पाठीमागून कंटेनरला धडक; आई-मुलगी जागीच ठार

डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या …

Read More »

मंत्री उमेश कत्ती यांना दिर्घायुष्य लाभो : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री …

Read More »

‘महसूल दाखले घरोघरी’ उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!

युवा नेते उत्तम पाटील : बोरगांवमध्ये घरपोच उतारे उपक्रमास प्रारंभ निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागासह वाडी-वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांना घरपोच उतारे मिळावेत, यासाठी राज्य सरकार महसूल खात्याकडून महसूल दाखले घरोघरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जागृती करून या उपक्रमाचा लाभ मिळावा,यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. घरपोच उतारे या …

Read More »

विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासामध्ये समतोल राखावा

 डॉ. एम. बी. शेख : कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळ याचा समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनू शकते. स्पर्धेमुळे संघभावना व खिलाडीवृत्ती वाढते, असे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य डॉ.एम. बी. शेख यांनी व्यक्त केले. …

Read More »

यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!

प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …

Read More »