Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी विधान सौधवर मोर्चा

  राजू पोवार : शेतकरी मेळाव्याचेही आयोजन निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेळगाव येथील विधानसभा गुरुवारी (ता.२१) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा होणार आहे. त्यामध्ये रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे. येथील शासकीय विश्राम धामात …

Read More »

सरकारने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत

  प्रशांत नाईक : राजेश क्षीरसागर यांची भेट निपाणी (वार्ता) : शिवसेनेचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कोल्हापूरमधील बुधवारपेठेतील कार्यालयातील निपाणी येथील शिष्टमंडळाने भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी निपाणीतील शिष्टमंडळातील प्रशांत नाईक आणि नवनाथ चव्हाण यांनी …

Read More »

ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते

  प.पू. महेशानंद महास्वामीजी यांचे विचार; हंचिनाळमध्ये गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मस्तकाला तृप्त करणारा प्रसाद आणि मन तृप्त करणारा प्रसाद गुरुंच्याकडून मिळतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते असे विचार प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के.एस (ता. निपाणी) येथील प.पू. ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित …

Read More »

बुदीहाळचे कृषी पंडित सुरेश पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार

  निपाणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त बुदीहाळ ता निपाणी, जि. बेळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विश्वनाथ पाटील यांना ‘पंडित दीन दयाल अत्योंदय कृषी पुरस्कार’ देशाचे कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत …

Read More »

तवंदी एसडीएमसी अध्यक्षपदी संतोष पाटील

  उपाध्यक्षपदी शामबाला पाटील : दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : कोणत्याही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो व तो निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व गावकरी मंडळींमधून एका व्यक्तीने सर्व कमिटी मेंबरला विश्वासात घेऊन शाळेची सुधारणा करण्यासाठी शाळा सुधारणा कमिटीची व्यवस्था शासनाने केलेली आहे. अशा तवंदी शाळेच्या शाळा …

Read More »

गुरुशिवाय जीवनात ध्येय गाठणे अशक्य

  प्राचार्य डॉ. शाह : देवचंदमध्ये गुरुपौर्णिमा साजरी निपाणी (वार्ता) : भारतीय परंपरेत गुरु – शिष्य नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. शिष्याला आपले जीवन सुखी – समृद्ध बनवायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणे आवश्यक आहे. गुरू शिवाय जीवनात इच्छित ध्येय गाठणे अशक्य आहे, असे मत प्राचार्य पी. पी. शाह …

Read More »

हिडकल डॅममध्ये युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकर्‍यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणार्‍या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार …

Read More »

प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …

Read More »

कोगनोळी येथे विद्युत स्पर्शाने तीन शेळींचा मृत्यू

कोगनोळी : विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. या पडलेल्या तारेला तीन शेळींचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, येथील हंचिनाळ रोडवर असणाऱ्या पीरमाळ येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. …

Read More »

कोगनोळी फाट्यावर अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर बसच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार तारीख 15 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. भानुदास श्रीपती विटे (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदास विटे हे करनूर येथून कोगनोळी …

Read More »