Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

चातुर्मास निमित्त 14 रोजी बोरगावात कलश स्थापना

  जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे …

Read More »

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा

निपाणी (वार्ता) : येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल चमूंचा वारकरी दिंडी सोहळा झाला. या कार्यक्रमात नर्सरी छोटा गट, मोठा गट व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारात बाल वारकरी विठ्ठल रुक्माईच्या समवेत दिंडी …

Read More »

कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून …

Read More »

कागिनेले येथे बुधवारी महासंस्थान गुरुवंदना कार्यक्रम

समाज बांधवांनी उपस्थित रहावे: लक्ष्मण चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान, कनकगुरुपिठाचे प्रथम जगत्गुरु बिरेंद्र केशव तारकानंदपुरी महास्वामीजी यांचे १६ वे पुण्यस्मरण व गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बुधवारी (१३) सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी बेळगांव जिल्हा धनगर समाज बांधवाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पावनसानिध्य …

Read More »

गोमतेची हत्या रोखा 

तहसीलदारांना निवेदन : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी निपाणी : शहर व ग्रामीण भागात हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेची हत्या रोखण्यात यावी. यासाठी हिंदुत्ववादी युवकांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले. यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनामधील माहिती अशी, काही धर्मांध लोक हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच …

Read More »

शेतकरी हुतात्मा दिनास उपस्थित राहावे

राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी …

Read More »

नामदेव मंदिरात एकादशी साजरी

निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११)  द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, …

Read More »

निपाणी तालुक्यातील माणकापुरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

निपाणी : विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. अर्चना गजानन बाळशेट्टी या 35 वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. विहिरीवरील मोटारपंप संचाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अर्चनाला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या पाणी पात्राबरोबर वाहू लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या …

Read More »

विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. सकाळपासूनच विठ्ठल कोळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक सभासद नागरिक यांनी गर्दी केली होती. येथील गर्ल हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल येथे विठ्ठल कोळेकर यांचा पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन …

Read More »