कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …
Read More »आषाढातही ’शुभमंगल सावधान’!
कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी …
Read More »सलग दुसर्या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने
घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट …
Read More »कोगनोळी नाक्यावरील दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात
वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा …
Read More »अन्न व औषध प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण
खाद्यपदार्थ विक्री व्यवसायिकांना प्रशिक्षण बंधनकारक : व्यवसायिकांना मिळणार प्रमाणपत्र निपाणी : केंद्र शासनाच्या एफएसएसएआय व फॉस्टॅक योजनेतून खाद्यपदार्थ आणि फळ विक्री व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांना हे प्रशिक्षण बंधनकारक असून त्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. …
Read More »म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!
डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा …
Read More »कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक बसेस परत महाराष्ट्रात
तपासणी कडक : महाराष्ट्रात रुग्ण वाढलेच्या कारणाने तपासणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवार तारीख 13 रोजी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी …
Read More »निपाणी नगरपालिका बैठकीत गोंधळ; सर्व विषयांना मंजुरी
सत्ताधारी- विरोधक आक्रमक निपाणी (संजय सुर्यवंशी) : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे सभागृहात मंगळवारी (ता.13) सकाळी झाली. सुरुवातीपासूनच गोंधळाच्या वातावरणात सभेला सुरुवात होऊन विषयपत्रिकेवरील सर्वच 26 विषयावर चर्चा न करता गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी घेऊन सत्ताधार्यांनी दीड तासातच सभा आटोपती घेतली. यावेळी मुन्सिपल हायस्कूल सरकारला हस्तांतरण करण्याच्या …
Read More »हंचिनाळ येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारसौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta