संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील मांसाहारी लोकांना मटण स्वस्त झाल्याची खुशखबर देणारे मटण विक्रेते शब्दाला जाणणारे दिसेनासे झाले आहेत. मटण पाचशे रुपये झाल्याचा फलक झळकविणारे मटण विक्रेते आता मटणाचा दर 560 रुपये सांगताहेत. मटणात किती मिक्स करुन दिली जाईल, असे सांगून मांसाहारी लोकांची भ्रमनिरास करताना दिसत आहेत. नंबर वन मटणाचा भाव …
Read More »बाड ग्रामस्थांची तहान भागविणारा अवलिया…..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बाड ग्रामस्थांची तहान भागविण्याचे कार्य बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके करताहेत. गेली दोन महिने झाली बाड ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ट्रॅक्टर टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम ते करताहेत. त्यामुळे ते बाड ग्रामस्थांची तहान भागविणारे अवलिया बनले आहेत. बाड गावातील सर्वच ग्रामस्थ प्रकाश मैलाके यांच्या घरपोच …
Read More »डॉ. सचिन नेत्रसेवेचे पाऊल पडते पुढे : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे कन्या शिया यांच्या अपघाती निधनानंतर डॉ. मुरगुडे यांची बंद पडलेली नेत्रसेवा डॉ. सचिन यांचे गुरुवर्य एम.एम.जोशी नेत्रविज्ञान संस्था पुढे चालविण्यास सिध्द झाल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. येथील श्री शंकरलिंग समुदाय भवनमध्ये …
Read More »संकेश्वरात इच्छापूर्ती श्री मारुती मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड, यशागोळ काॅलनीतील इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा पवनपुत्राच्या जयंतीला भक्तीमय वातावरणात पार पाडण्यात आला. संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रशेखर यशागोळ यांचे हस्ते नूतन श्री मारुती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पुरोहित …
Read More »संकेश्वरात श्री हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा …
Read More »कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता …
Read More »डॉ. मुरगुडे यांना नेत्रसेवेने श्रध्दांजली
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या कु. सिया मुरगुडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा नेत्रसेवेचा वारसा आता हुबळी येथील एम.एम.जोशी नेत्र विज्ञान संस्था पुढे चालविणार असल्याचे कम्युनिटी इन्चार्ज संजय कुलकर्णी, कुतबुद्दीन मुल्ला (सीईओ) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येथील डॉ. मुरगुडे इस्पितळात …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे स्वप्न साकारले : अॅड. प्रमोद होसमनी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका आवारातील बागेला (गार्डनला) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण करण्यात आले पण पुतळा उभारण्याचे कार्य गेल्या कांही वर्षांपासून राहून गेले होते. शुक्रवार दि. 14 रोजी पुतळा उभारणेच्या कार्याचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक अॅड. प्रमोद होसमनी यांनी सांगितले. नगराध्यक्षा सौ. …
Read More »बहुजन क्रांती मोर्चातर्फे रविवारी तालुकास्तरीय संमेलन
जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी …
Read More »संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोचा जयजयकार….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोच्या जयजयकारात महावीरांचा पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गे काढण्यात आला. अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तिर्थंकार वर्धमान महावीर जयंती निमित्त आज सकाळी बस्ती येथील मंदिरात महावीरांना पंचामृत अभिषेक करण्यात आला. तद्नंतर महावीरांचा पालखी सोहळा गावातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta