Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठी भाषिकानी मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बुधवारी खानापूर तालुक्यातील गर्बेनट्टी, खैरवाड, बेकवाड, …

Read More »

कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी

  बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपीना जामीन

  बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा …

Read More »

उत्तर कन्नडमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून 7 जणांचा मृत्यू

  अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक भीषण दुर्घटना घडली असून डोंगर कोसळून ७ मजूर चिखलात अडकल्याची घटना शिरूरजवळ घडली आहे. अंकोला तालुक्यातील शिरूरजवळील राष्ट्रीय महामार्गालगत ही दुर्घटना घडली असून अजूनही अनेक लोक चिखलाखाली अडकल्याचा संशय आहे. अपघातावेळी कामात गुंतलेले लॉरी आणि टँकर नदीत वाहून गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; लोंढा परिसरातील घटना

  लोंढा : शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर तीन अस्वलानी पाठीमागून हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लोंढा येथे सदर घटना घडली. दगडाने मारल्यामुळे तीन अस्वले शेतकऱ्याला सोडून पळून गेली. सकाळी नेहमी प्रमाणे प्रभू शिनुटगेकर हे आपल्या शेताकडे निघाले …

Read More »

मागासवर्गीय समाजातील युवकांनी उद्योजक व्हावे

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी; बोरगाव ओमगणेश टेक्स्टाईलला भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. अल्प व्याजदरात व मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा दलित व मागासवर्गीय समाजातील युवकांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

सीमाप्रश्नी संसदेत आवाज उठवावा; खासदार शाहू महाराज यांना निपाणी विभाग समितीच्यावतीने विनंती

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे नु पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, त्यानंतर सीमाप्रश्नी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून सीमाभागाधील 865 …

Read More »

विधानसभेत दिवंगत सदस्य, मान्यवरांना श्रद्धांजली

  बंगळूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत आज अलीकडेच निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी शोकप्रस्ताव मांडला, त्यांनंतर सदस्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला व श्रध्दांजली वाहीली. माजी मंत्री नागम्म केसवमूर्ती, केंद्र व राज्याचे माजी मंत्री व्ही. श्रीनिवास प्रसाद, विधान …

Read More »

विधिमंडळातील दोन्ही सभागृहात वाल्मिकी घोटाळ्यावरून वाद; भाजप – काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी

  बंगळूर : विधानसभेच्या दोन्ही सभागृहात सोमवारी राज्याच्या मालकीच्या महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यावरून विरोधी भाजप आणि सत्ताधारी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाल्मिकी घोटाळ्यात शेकडो कोटींची लूट झाली आहे, असा प्रश्न आज विधानसभेत उपस्थित करून सरकारवर जोरदार हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी चर्चेला जागा द्यावी, …

Read More »

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

  क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत चालले असून नवनवीन उपक्रम व संशोधन होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण हे महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व द्या, असे आवाहन इनरव्हील क्लबच्या चार्टर सदस्या क्षमा मेहता यांनी केले. इनरव्हील क्लबतर्फे अंमलझरी सरकारी शाळेत …

Read More »