Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

बोरगाव ‘अरिहंत’ बँकेच्या गळतगा शाखेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) गळतगा शाखेचा २४ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य शाखेची आर्थिक उलाढाल वाढत असल्याने सभासद व संचालकांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीशील वाटचालीत मान्यवर, सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी …

Read More »

हत्तीच्या कळपाचा तिवोली, गुंजीत उपद्रव; भीतीचे वातावरण

  खानापूर : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तिवोली आणि गुंजीसह आसपासच्या भागात हत्तींचा उपद्रव तीव्र झाला आहे. दररोज विविध गावांत टोळके शिरून भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असून, सुगी हंगामातच हा अनाहूत संकट शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्याची शेतकऱ्यांची धांदल …

Read More »

रामचंद्र पाटील यांनी लिहिलेल्या “पारिजात” काव्यसंग्रहातील गीतांचे उद्या सादरीकरण

  खानापूर : मुळचे भंडरगाळी खानापूर व सध्या मुक्काम बाबले गल्ली अनगोळ येथील रहिवासी रामचंद्र पाटील यांनी लिहिलेल्या “पारिजात” या काव्यसंग्रहातील गीतांचे सादरीकरण मधुगंध या कार्यक्रमातून वेणुध्वनी 90.4 या रेडिओ स्टेशनवरून प्रसारित करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या …

Read More »

शिवठाण हायस्कूलमध्ये ‘सायन्स ऑन व्हील’ व शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे गोवा व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स ऑन व्हील व शालेय विज्ञान प्रदर्शन भव्यदिव्य वातावरणात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्‌गुरू श्री. बळीराम मिराशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद …

Read More »

इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यांची निपाणकर सरकार राजवाड्यात भेट

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांच्या राजवाड्यास इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दांपत्यासह कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंडळाचे संचालक गणेश नेर्लीकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ.व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यानी राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी राजवाडा आणि भुईकोट …

Read More »

पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावर पिलरची उभारणी

  युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) …

Read More »

निपाणीत बंगला फोडून २२ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

  बंद घराला केले लक्ष: चांदीच्या दागिन्यासह २५ हजार लंपास निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट केली. बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यासह रोख २५ हजार रुपये कंपास केले आहेत. या घटनेमुळे उपनारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजू …

Read More »

ग्रामीण टेनिस बॉल ‘चेअरमन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे निपाणी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने हिमांशू उर्फ शशांक पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी (ता.२६) उद्घाटन करण्यात आले. स्वप्निल पावले यांनी स्वागत केले. येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित उद्घाटन प्रसंगी सहकाररत्न डॉ. …

Read More »

लंपी आणि लाळ्या खुरकत रोगाचे तालुक्यातील शिल्लक लसीकरण पूर्ण करा; पशुवैद्यकीय उपसंचालकांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्याचे कळप आपल्या खानापूर तालुक्यात येत असतात, लाळ्या खुरकतचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात त्यामुळे उपाय योजना करावी, लंपी सुद्धा पूर्णपणे प्रतिबंधित नाही त्यामुळे गाई, बैलामध्ये याचे परिणाम जास्त आढळतात. …

Read More »

बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन पुणेतर्फे उपक्रमशील शाळांचा सन्मान

  शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन खानापूर : गोवा सायन्स सेंटरमिरामार, पणजी गोवा डिस्ट्रिक्ट सायन्स सेंटर, गुलबर्गा, ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स ऑन व्हील आणि ज्ञान प्रबोधिनी, पुणे निर्मित व्हर्च्युअल रिॲलिटी या उपक्रमातून खानापूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार प्रसार सुरू असून आजतागायत तालुक्यातील निम्म्याहून …

Read More »