Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

बेळगाव आणि खानापुरात उद्या शाळांना सुट्टी

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या बुधवार दि. 25 जून रोजी असणार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.

Read More »

काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव: सत्ताधारी काँग्रेसमध्ये असंतोष वाढत असल्याने राजू कागे यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सांगितले. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार पडण्याची वेळ जवळ येत आहे. मुख्यमंत्री बदलतील की नाही हे माहित नाही. …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर

  राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काँग्रेस हायकमांडच्या भेटीचे नियोजन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या संध्याकाळी दिल्लीला जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटण्याचा त्यांचा मानस आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडलाही भेटून राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती देतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्य आणि भाजपच्या …

Read More »

राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वाढता असंतोष

  सरकारसमोर पेच; असमाधान व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढतीच बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. सत्ताधारी पक्षातील एकामागून एक एक आमदार सरकारविरुद्ध विधाने करत आहे, ज्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून सरकारी पातळीवर सर्व काही ठीक नाही, कॉंग्रेस पक्षात असंतोष वाढत असल्याचे …

Read More »

नवीन जात सर्वेक्षणात शिक्षक सहभागी होणार नाहीत

  मंत्री मधू बंगारप्पा; सर्वेक्षण आउटसोर्स केले जाणार बंगळूर : सरकारी शाळेतील शिक्षकांच्या सेवा वापरण्याऐवजी नवीन जात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी एजन्सीला देण्याची योजना आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी सरकारला आधीच स्पष्ट केले आहे की जर सर्वेक्षणाच्या …

Read More »

लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…

  लोंढा : बेळगाव-पणजी महामार्गावर लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत 300 मीटर लांब रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे किरकोळ अपघात सामान्य व ग्रामस्थांना तातडीने दुरूस्ती करावी लोंढा गावाला लोंढा जंक्शन असे म्हटले जाते, कारण गोव्याला जाणारे बहुतेक प्रवासी हाच मार्ग वापरतात. महामार्ग …

Read More »

खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन…

  खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात …

Read More »

मोदी सरकारने आरोग्य समस्या ‘समग्र’ दृष्टिकोनातून सोडवल्या अमित शहा; आदिचुंचनगिरी विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन

  बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठीच्या समग्र दृष्टिकोनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.२०) कौतुक केले. आदिचुंचनगिरी विद्यापीठ (एसीयु) बंगळूर कॅम्पसचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. “आपले नेते आणि पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटले होते की गरिबीचा सर्वात मोठा …

Read More »

खानापूरच्या जनतेला “इंदिरा कॅन्टीन”चा लाभ : माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यातून सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी असते. इंदिरा कॅन्टीन ही संकल्पना सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात 2013 ते 2018 या काळात सुरू केलेला प्रकल्प आहे. खानापूर तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात 2018 ते 2023 या …

Read More »

माजी आमदार कै. काकासाहेब पाटील हे सामान्य जनतेचे नेते : मंत्री सतीश जारकीहोळी

  सर्वपक्षीय शोकसभा निपाणी : एका सामान्य कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे …

Read More »