खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अष्टप्रतिनिधी मंडळाचा दौरा दि. २१/११/२०२२ रोजी रात्री ७ वाजता दोड्डहोसूर येथे गावचे प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण महादेव पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मधू परशराम पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, देवाप्पा पाटील, संजय पाटील, कल्लाप्पा मादार, शंकर पाटील, ईराप्पा …
Read More »सौंदलगा येथे बाजारपेठेतील रस्त्याची चाळण; रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
सौंदलगा : सौंदलगा येथील बाजारपेठेतील रस्त्याची चाळण रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, रस्त्यावरील खडे उखडून निघाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सौंदलगा गाव हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाणी असून या गावातूनच आडी, बेनाडी, भिवशी, जत्राट, या गावातील नागरिकांना जावे लागते. त्याबरोबरच मंगळवारी येथे मोठ्या …
Read More »महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने सौहार्दता राखली पाहिजे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
बेंगळुर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्यांना मी सर्व …
Read More »खानापूर-रामनगर महामार्गाच्या कामाला सुरूवात; मातीचा वापर केल्याची तक्रार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षभरापासून कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खानापूर- रामनगर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामात मोहरम टाकून काम करण्याऐवजी केवळ माती टाकून महामार्गाचे काम करण्यात येत असल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकाना …
Read More »शेडेगाळी गावामध्ये उद्यापासून कटबंद वार
खानापूर : तालुका खानापूर मौजे शेडेगाळी येथे सात वर्षानंतर होणाऱ्या गोंधळाचे वार दि. 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हे वार दि. 25 नोव्हेंबर (शुक्रवार) दि. 29 नोव्हेंबर (मंगळवार) दि. 2 डिसेंबर (शुक्रवार) दि. 6 डिसेंबर (मंगळवार) असे पाच दिवस पाळण्यात येणार असून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांना तसेच पाहुणे मंडळींना …
Read More »मंगळूर ऑटो बॉंब स्फोट प्रकरण; संशयित आरोपी दहशतवादी संघटनेने प्रेरित
महासंचालक आलोक कुमार, शारिकच्या खोलीत सापडली स्फोटके बंगळूर : ऑटो रिक्षा प्रकरणातील गूढ स्फोटातील संशयित शारिक याला एका दहशतवादी संघटनेने कट्टरपंथी बनवले होते, असे कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस कायदा व सुव्यवस्था महासंचालक आलोक कुमार यांनी सोमवारी मंगळूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शारिक हा जागतिक दहशतवादी संघटनेने “प्रभावित आणि प्रेरित” होता, …
Read More »म. ए. समितीच्या पाठीशी इदलहोंडवासीय खंबीर
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विस्तृत कार्यकारिणी करण्यासाठी इदलहोंड पंचायतमधील गावे खेमेवाडी, झाडअंकले, माळअंकले, सिंगीनकोप आणि निट्टूर पंचायतीतील निट्टूर व गणेबैल गावांचा समितीच्या आठ प्रतिनिधींसमवेत समितीची नेतेमंडळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, संतोष पाटील इत्यादींनी दौरा केला. इदलहोंड येथील श्रीपिसेदेव मंदीरात सभा …
Read More »ऊस दर प्रश्नी विधानसभेवर आंदोलनाची तयारी पूर्ण
राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांच्याशी बैठक निपाणी : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी केली …
Read More »मतदार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवा
निवडणूक अधिकारी प्रविण कारंडे : निपाणी, बेडकीहाळ येथे बीएलओंना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली असून ८ डिसेंबरपर्यंत सदर मतदार यादी संदर्भात कोणत्याही हरकती असल्यास नोंदवाव्यात. तसेच अजूनही वंचित असलेल्या व्यक्तींची मतदारयादीत नावे नोंदविण्यासाठी ८ डिसेंबरपूर्वी मुदत आहे. या वेळेत बीएलओ यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे जागृती करावी, …
Read More »शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : येथील शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी लावलेल्या दिल्यामुळे हनुमान मंदिर परिसर उजळून निघाला होता. तत्पूर्वी सकाळी हनुमान मूर्ती अभिषेक घालण्यात आला. प्रारंभी नगरसेवक संतोष सांगावकर, रवींद्र इंगवले, पत्रकार राजेंद्र हजारे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर भाविकांनी हनुमान मंदिर परिसरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta