बंगळुरु : सध्या एक कन्नड चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘७७७ चार्ली’ असे आहे. या चित्रपटाचे कर्नाटकसह देशात इतर ठिकाणी सुद्धा कौतुक होत आहे. १० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई चांगलेच भावूक झाल्याचे …
Read More »जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …
Read More »कोगनोळी परिसरात वटपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न
कोगनोळी : कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात सात जन्मी हाच पती मिळू दे असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत महिलांनी परिसरात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी केले. यावेळी सुवासिनींनी आपले व आपल्या पतीचे दिर्घआयुष्यासाठी व सातजन्मच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी …
Read More »कावेरी प्रकरणी आम्हाला न्याय मिळेल : मुख्यमंत्री बोम्मई
बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. …
Read More »इंडस्ट्रीत क्वालिटी हवी : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : इंडस्ट्रीत क्वालिटी कंट्रोल करण्याचे कार्य केल्यास उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ निश्चितच लाभणार असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. श्रींच्या दिव्य सानिध्यात दि. बेळगाम इंडस्ट्रीयल को-ऑप बॅंक शाखा संकेश्वरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री …
Read More »अण्णा-तम्माच्या गुजगोष्टी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्रात अण्णा-तम्माचे राजकारण कार्यकर्त्यांना समजण्या पलिकडचे झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संभ्रमावस्थेत दिसत आहेत. येथे अण्णांची भूमिका माजी मंत्री ए. बी. पाटील, तर तम्माची भूमिका राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उत्तम प्रकारे वठवित आहेत. दोघांमध्ये कधी …
Read More »संकेश्वरात शिवराज्याभिषेक दिन दुग्धाभिषेकने साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि पुष्पवृष्टी करीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. अभिषेक कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, जयप्रकाश सावंत, समीर पाटील, अप्पा मोरे, डॉ. मंदार हावळ, शाम यादव, सुभाष कासारकर, पुष्पराज माने यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज की …
Read More »साने गुरुजी हे थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते : प्रा. एम. एल. कोरे
शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागात साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी कागवाड : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी. दुसर्यांना हसवणे सोपे असते. मात्र, दुसर्यांसाठी रडणे हे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंतकरण लागते अशी शिकवण देणार्या आणि आपणास प्रिय असणार्या साने …
Read More »नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी; भारताचा क्रिकेटपटू वेंकटेश भडकला!
नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा जगभर निषेध केला जात आहे. एका बाजूला नुपूर शर्मा यांच्याविरोधात आंदोलन सुरू असताना दुसर्या बाजूला असे ही काही लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देत आहेत. यात भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. भारताचा माजी …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta