Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

बंगळुरसह राज्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये भव्य मॉकड्रिल

  युद्धजन्य आणीबाणी परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये जागृती बंगळूर : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक होत असताना, या युद्ध परिस्थितीसाठी नागरिकांची आपत्कालीन तयारी तपासण्यासाठी बंगळुर शहरासह राज्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण आणि अग्निशमन सेवांकडून भव्य मॉकड्रिल करण्यात आले. युध्दजन्य आणीबाणी परिस्थितीत नागरिकांचे कर्तव्य, जबाबदारी आणि सावधगिरी याबाबतची …

Read More »

नागपूर येथील दीक्षांत समारंभात; डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांना पदवी बहाल

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून ७ सुवर्णपदके मिळवत एम‌. डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी पूर्ण केली. त्यानंतर वर्धा-नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनएमसी) येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले. पदव्युत्तर दिक्षांत समारंभात एएफएमसीच्या व्हाइस एडमिरल डॉ. …

Read More »

निपाणीत १४ पासून खासदार चषक टॉप स्टार प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे बुधवारपासून (ता. १४) २ लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे असणाऱ्या ‘खासदार चषक’ टॉप स्टार प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बुडा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आले लक्ष्मण चिंगळे …

Read More »

बेकायदेशीर खाणकाम : माजी मंत्री आमदार जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांची शिक्षा

  सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल बंगळूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओबळापुरम मायनिंग कंपनी (ओएमसी) च्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री आणि गंगावतीचे विद्यमान आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ओएमसी बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात युक्तिवाद ऐकणाऱ्या हैदराबाद सीबीआय न्यायालयाने आजसाठी निकाल राखून …

Read More »

कारवार, बंगळुर, रायचूर येथे आज दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल युद्धाचा सायरन वाजणार

  बंगळूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची तयारी करत असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटकसह अनेक राज्यांना उद्या (ता. ७) मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात, उद्या बंगळुर, कारवार आणि रायचूर येथे मॉक परेड आयोजित केल्या जातील. याबद्दल माहिती देताना डीजेपी प्रशांत कुमार ठाकूर …

Read More »

हुबळीजवळ लॉरी- कार यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

  हुबळी : हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळील इंगळहळ्ळी क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विजयपुरहून हुबळीकडे येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली. धडक इतकी भीषण होती की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. श्वेता (२९), अंजली (२६), संदीप (२६), विठ्ठल …

Read More »

“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” : अवनिशला भावपूर्ण श्रद्धांजली!!

    “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचा सर्वांचा लाडका हसतमुख असा कुमार अवनिश विनोद देसाई मुळगाव डोंगरगाव सध्या राहणार पणजी गोवा याची दि. 26 एप्रिल 2025 रोजी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आज अकराव्या दिवसानिमित्त त्याच्याविषयी थोडक्यात… कुमार अवनिश हा ओल्ड गोवा ग्रामपंचायतचे सदस्य विनोद देसाई व …

Read More »

अनुसूचित जाती सर्वेक्षण : राज्यात अंतर्गत आरक्षण जनगणना सुरू

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; तीन टप्यात होणार सर्वेक्षण बंगळूर : अनुसूचित जाती आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक डेटा गोळा करण्यासाठी सोमवार (ता. ५) पासून तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, अनुसूचित जातींसाठी अंतर्गत आरक्षण जनगणना आजपासून १७ मे पर्यंत केली जाईल. पहिला …

Read More »

शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

  खानापूर : खानापूर-परीश्वाड मार्गावरील कुप्पगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून सदर घटना आज सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ …

Read More »

चोर्ला गावानजीक मालवाहू रिक्षा आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील युवक विक्रम कोळेकर (वय 28 वर्ष) हा युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, विक्रम …

Read More »