Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

घोटगाळीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इरफान तालिकोटीच्यावतीने मोफत डान्स स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले …

Read More »

गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग

खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या. तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते. …

Read More »

विद्युत तारांच्या घर्षणाने तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसाला आगी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र खानापूर तालुका वाळू मिश्रीत जमिनीचा असल्याने केवळ भात आणि ऊस ही केवळ दोनच पिके घेतात. या ऊस पिकाला मात्र जंगली प्राण्यांची तसेच आगीची भय असूनही तालुक्यातील शेतकरी धाडसाने भात पिकांबरोबर ऊसाचे …

Read More »

हलशी मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी एसडीएमसी अध्यक्ष श्रीकांत गुरव व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एल. डी. …

Read More »

जांबोटीत खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेची मासिक बैठक आणि वार्षिक कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेची मासिक बैठक प्राथमिक मराठी शाळा जांबोटी येथे शनिवारी दि. ४ रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते. तर व्यासपिठावर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर सन् २०२२सालाचे …

Read More »

शाळा, महाविद्यालयात गणवेश सक्तीचा

सरकारचा अधिकृत आदेश : हिजाब – भगवी शाल वादावर तोडगा बंगळूर : कर्नाटकातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेश संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे अधिकृत परिपत्रक पदवीपूर्व शिक्षण खात्याचे अधीन सचिव पद्मीणी एस. एन. यांनी आज (ता. ५) जारी केले आहे. राज्यातील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयात सरकारने निश्चित केलेला गणवेश व खासगी संस्थातून …

Read More »

भाजपा युवामोर्चा एससी अध्यक्षपदी गंगाराम भूसगोळ

उपाध्यक्षपदी सचिन सपाटे यांची निवड संकेश्वर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिकोडी जिल्हा हुक्केरी मंडल युवामोर्चा (एससी) घटक अध्यक्षपदी संकेश्वरचे नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांची तर (एसटी)घटक उपाध्यक्षपदी युवानेते सचिन सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. हुक्केरी मंडल सामान्य युवामोर्चा प्रधानसचिव म्हणून युवानेते प्रदीप माणगांवी, सदस्यपदी संदिप दत्तू गोंधळी, संदिप दवडते, …

Read More »

कॅन्सरला घाबरु नका : डाॅ. एस. व्ही. मुन्याळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : कॅन्सरला घाबरु नका. त्यावर प्रभावी औषधोपचार आहेत. कर्करोगाचे वेळीच निदान झाले की धोका टाळता येणे शक्य असल्याचे बेळगांव जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी सांगितले. ते संकेश्वर शासकीय रुग्णालय, एनसीडी घटकतर्फे आयोजित कॅन्सर डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विक्रांत रायप्पगोळ यांनी केले. …

Read More »

अंकलेची पाणी समस्या सुटली : रमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले ग्रामपंचायतची पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न फलदायी ठरल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले गाडगी गल्लीतील श्री गणेश जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अंकलेकरांचा पाणी प्रश्न सुटला …

Read More »

गर्लगुंजीच्या वेशीत बस शेडसाठी टाकलेल्या खड्डी, वाळूचा वाहतुकीला अडथळा

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या वेशीत नव्याने उभारण्यात आलेल्या बस शेडसाठी वाळू, खड्डी व इतर साहित्य लक्ष्मीमंदिराच्या समोर आणून टाकण्यात आले आहे. त्यातच बस शेडचेही काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वाळू, खड्डी व इतर साहित्याची वाहतुकीला तसेच गावच्या नागरिकांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा …

Read More »