Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

महांतेशआण्णा कवठगीमठ यांच्या प्रचारार्थ सौंदलगा येथे सभा संपन्न

सौंदलगा : आडीमल्लया देवस्थान येथे विधान परिषद निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नगरसेवक, नगरसेविका यांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर प्रास्ताविकात भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील यांनी महांतेशआण्णा कवठगीमठ यांना निवडून देऊन, भारतीय जनता पक्ष विधान परिषदेत बळकट करा असे …

Read More »

बेळगावसह राज्यभरात एसीबीचे छापे; बेळगावात ३ ठिकाणी धाडी : परदेशी चलन आढळले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एसीबीने बुधवारी सकाळी–सकाळीच ३ अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली. त्यातही बेळगाव शहरात टाकलेल्या धाडीत विदेशी चलन आढळून आले. या धाडसत्रामुळे सरकारी अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.होय, अँटी करप्शन ब्युरोने आज बेळगावसह राज्यभरात एकाचवेळी धाडी घालून एकच खळबळ उडवून दिली. तब्बल ६० ठिकाणी या धाडी …

Read More »

मुरडेश्वराच्या शिवमुर्तीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी

इसिसच्या मुखपत्रात मुर्डेश्वराची भग्न मुर्ती : बंदोबस्तात वाढ बंगळूर : कर्नाटकातील प्रसिध्द पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखण्यात येत असलेल्या मुर्डेश्वर देवस्थानावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. कुख्यात इसिस दहशतवादी संघटनेच्या ’द व्हाईस ऑफ हिंद’ या पत्रकात मुर्डेश्वर येथील शिवाची भग्न मुर्ती प्रसिध्द केल्याने सोशल मेडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देवस्थानला …

Read More »

सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …

Read More »

खासगी फायनान्सच्या जाळ्यात महिला

आठवडाभराची कमाई कंपनीला : अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर निपाणी : खासगी फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागातील महिला बचतगटांसह नागरिकांना कर्ज वाटप केले जाते. या कंपन्या बँकांकडून व्यावसायिक दराने कर्ज घेऊन बँक खाते नसलेल्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे बचतगट तयार करून महिलांना मायक्रो फायनान्सचे कर्ज देते. त्यांच्या व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी …

Read More »

मुलांच्या हातात लेखणी ऐवजी कोयता!

ऊसतोड मजुरांच्या समस्या कायम : मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर निपाणी : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांचा दिवस हा पहाटेच्या चार वाजेपासून सुरू होतो. सकाळचा स्वयंपाक आवरून पहाटे चारच्या सुमारास खोपीवरून ऊसाच्या फडात जाणारे कुटुंब हे दुपारी दोन ते चारच्या दरम्यान पर येतात. ऊस बागायतदारांचा ऊसाचा कारखान्यात वेळेत पोहचला पाहिजे, या …

Read More »

डिसेंबर शेवटच्या आठवड्यात होणार बोरगाव नगरपंचायत निवडणूक

शासनाकडून हिरवा कंदील : इच्छुकांच्या हालचाली वाढल्या निपाणी : कार्यकाळ संपलेल्या राज्यातील 56 नगरपंचायतना डिसेंबर शेवटच्या आठवड्यात निवडणूक घ्यावे असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकार व निवडणूक आयोगास दिले आहे. यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बोरगाव नगरपंचायतीची ही निवडणूक होणार आहे. यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. …

Read More »

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या माजी आमदारांकडून भाजपचा प्रचार?

भाजप नेत्यांसमवेत बैठक खानापूर : बेळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर येथे घेण्यात आलेल्या भाजप चर्चा बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार उपस्थित असल्याने समिती गोटात हा चर्चेचा विषय ठरला आहे. रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी हे विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी बंधूंकडून …

Read More »

मंत्री देणार अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट : मुख्यमंत्री बोम्माई

नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू बंगळूर : राज्यातील सर्व मंत्री पावसाने ग्रासलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील आणि तेथे मदतकार्याची देखरेख करतील. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू असून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई रविवारी येथे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. अनेक मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये आहेत कारण हा …

Read More »

दहावीच्या वार्षिक परीक्षेला विलंब होण्याची शक्यता

बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्‍या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत …

Read More »