Sunday , July 26 2026
Breaking News

क्रिडा

भारतीय संघात दिनेश कार्तिक याला संधी शक्य?

मुंबई : क्रिकेट जगतात सध्या आयपीएल-2022 ची धूम आहे. कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष या लीगवर असले तरी सर्वांची नजर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेवर आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या मालिका खेळावयाच्या आहेत. यामुळे आयपीएलनंतर टीम इंडिया पूर्ण अ‍ॅक्शनमध्ये परतणार आहे. आयपीएलनंतर लागलीच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची …

Read More »

लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स प्ले-ऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात …

Read More »

पीव्ही सिंधू उबेर कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या उबेर कप स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात …

Read More »

गुजरात-लखनऊ आज आमनेसामने!

दोन्ही संघांना बाद फेरीतील स्थान निश्चितीची संधी पुणे : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. गुजरात …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय

मुंबई : भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर यशाची चव चाखली असून सोमवारी त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय संपादला. त्यामुळे अकरा सामन्यांतून कोलकाताचे 10 गुण झाले असून त्यांच्यासाठी हा विजय दिलासादायक ठरला आहे. त्याचवेळी मुंबईला नववा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे अकरा सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. …

Read More »

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पीव्ही सिंधुची उपांत्यफेरीत धडक

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आपला दमदार फॉर्म कायम ठेवत महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारलीय. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या सिंधुनं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हि बिंग जियाओला पराभूत केलं. हि बिंग जियाओ विरुद्ध पीव्ही सिंधुनं 21-9, 13-21, 21-19 असा विजय …

Read More »

आयपीएलवर दहशतवादाचे सावट; एटीएसने दिला इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होणार आहे. मात्र दहशतवादी विरोधी पथकाने आयपीएल खेळवण्यात येणारी ठिकाणे आणि खेळाडूंची हॉटेल्स ही दहशतवाद्यांच्या रडावर असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील आयपीएल व्हेन्यू आणि खेळाडूंच्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एटीएसने काही …

Read More »

हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याने इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती दिली. धोनी एक खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. आयपीएल 2022 च्या …

Read More »

एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद

एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद   आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी, CSK ने त्यांच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. “एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार पद सोडले आहे. आयपीएल 2022 चा हंगाम सुरु होण्याच्या दोनच दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना चकित केले असून CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नचे निधन

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच …

Read More »