मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढाईत सनरायझर्सने मुंबईला तीन धावांनी पराभूत केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला फक्त १९० धावा करता आल्या. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठी, प्रियाम गर्ग आणि गोलंदाजी विभागात उमरान मलिकने चांगला खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह …
Read More »दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जवर १७ धावांनी मात
विजयानंतर घेतली थेट चौथ्या क्रमांकावर उडी मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंबाज किंग्ज हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली …
Read More »राजस्थानचा लखनऊवर २४ धावांनी विजय
मुंबई : आयपीएलच्या पंधाराव्या पर्वात ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली. राजस्थानने विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य दिलेले असताना लखनऊ संघाला १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणमी राजस्थानचा २४ धावांनी विजय झाला. फलंदाजीमध्ये यशस्वी जैसवाल तर गोलंदाजी विभागात ट्रेंट बोल्ट आणि ओबेद मॅकॉय यांनी चांगला खेळ केल्यामुळे …
Read More »ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
सिडनी : क्रीडा जगतासाठी आज सकाळी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे. अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातामध्ये मृत्यू झाला. सायमंड्सला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये …
Read More »थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर भारताची माेहर
नवी दिल्ली : भारतीय संघाने बॅडमिंटनमध्ये आज ऐतिहासिक कामगिरी करत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत १४ वेळा अजिंक्यपद पटकावणार्या इंडोनेशिया संघाचा अंतिम सामन्यात 3-0 असा पराभव करत भारताने सुर्वणपदकावर आपली मोहर उमटवली. किदांबी श्रीकांत याने तिसरा गेम जिंकला आणि देशभरात उत्साहाला उधाण आलं. कारण ही स्पर्धा …
Read More »प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्याचे आव्हान!
आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने पुणे : सलग चार पराभवानंतर विजयपथावर परण्यासाठी उत्सुक असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. प्लेऑफ फेरीतील स्थानांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. हैदराबादच्या संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. फलंदाजीत …
Read More »पंजाब किंग्जचा बंगळुरुवर ५४ धावांनी विजय, प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या लढतीत पंजाब किंग्जने बंगळुरु संघावर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेले २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. वीस षटकांपर्यंत बंगळुरु संघ १५५ धावा करु शकला. पंजाबच्या लियाम लिव्हिगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळेच पंजाबला विजयापर्यंत पोहोचता …
Read More »बंगळूरुचे सातत्य राखण्याचे लक्ष्य!; आजच्या सामन्यात पंजाबचे आव्हान
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे सातत्यपूर्ण कामगिरीचे लक्ष्य असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी त्यांच्यापुढे पंजाब किंग्जचे आव्हान आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळूरुचा फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. ड्युप्लेसिस, हेझलवूडवर भिस्त बंगळूरुचा माजी कर्णधार कोहलीला यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडावे लागले आहे. त्याला १२ सामन्यांत …
Read More »मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ वा सामना खास ठरला. कारण या सामन्यात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई संघाच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. या सामन्यात मुंबईचा पाच गडी आणि पाच षटके एक चेंडू राखून विजय झाला असून चेन्नईचा पराभव झाला …
Read More »दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून विजय
मुंबई : आयपीएल २०२२ चा ५८ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta