नवी दिल्ली : पंजाब दौर्यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीं प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. …
Read More »साखर कारखान्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर विकास निधी अधिनियम,1983 अंतर्गत पुनर्रचना करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन वर्षांची सवलत आणि पाच वर्षात कर्जफेड करण्याच्या तरतुदीमुळे, एसडीएफ कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यामुळे केंद्राने वर्तवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु, व्यावसायिक क्षमता असलेल्या आणि ज्यांनी साखर …
Read More »गोव्यात निगेटिव्ह अहवाल अथवा लसीकरणाची सक्ती
पणजी (वार्ता) : गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन गोवा सरकारने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये तूर्तास …
Read More »तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा
रायपुर : सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे तेलंगणा आणि छत्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली उसुन या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यम सदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. भद्राद्री कोठागुडेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. …
Read More »पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?
अनियंत्रित गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र नवी दिल्ली : पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले 2021 हे वर्ष संपून 2022 ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे. दरम्यान, या विषयी गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना …
Read More »निवडणुका असणार्या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा : निवडणूक आयोग
नवी दिल्ली : एकीकडे देशात ओमायक्रॉनचं संकट असल्याने केंद्राने राज्यांना योग्य ती पूर्वकाळजी घेण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे पाच राज्यांमध्ये होणार्या निवडणुका चिंतेचा विषय ठरत आहेत. ओमायक्रॉनमुळे राज्यांकडून निर्बंध आणले जात असताना दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र पूर्वतयारी करत असून लोकांची गर्दी जमवताना दिसत आहे. अलाहाबाद हायकोर्टानेही ओमायक्रॉनची दखल घेत निवडणूक …
Read More »जनरल बिपिन रावत यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली : भारताच्या तीन दलांचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. संसदेत या संदर्भात त्यांनी माहिती जाहीर केली. तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम जाहीर केला. त्यावेळी संसदेतील उपस्थित सदस्यांना देखील गहिवरून आले. …
Read More »देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन
नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय 175 व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने …
Read More »उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत शिवसेनेची युती?
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसशी युती करण्याचे संकेत मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस शिवसेना युतीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. राऊत यांनी मात्र राज्यातील राजकारणासंदर्भात चर्चा झाली उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भातही …
Read More »गोव्यात काँग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला ‘रामराम’
पणजी : गोव्यात काँग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. या पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे गोव्यातील काँग्रेस आमदारांची संख्या आता केवळ तीन वर आली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात लुईझिन्हो फालेरिओ यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेसचा रस्ता धरला होता. अर्थात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta