Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा

  नवी दिल्ली : हवामान खात्याने देशातील ७ राज्यांमध्ये पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसांनंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. …

Read More »

पक्षाने तिकीट दिले पण प्रचारासाठी पैसे दिले नाही म्हणून काँग्रेसच्या महिला उमेदवाराची निवडणुकीतून माघार

  निवडणूक आली की, निवडणूक लढविणाऱ्यांचा पुढाऱ्यांचा ओढा पक्ष कार्यलायकडे असतो. तिकीट मिळावे म्हणून ज्येष्ठ नेत्यांचे उंबरे झिजवले जातात. पण ओडिशामध्ये एक अजबच प्रसंग घडला. इथे पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराने मिळालेले तिकीट पक्षाला परत केले आहे. सुचरिता मोहंती यांना काँग्रेसने तिकीट दिले, मात्र प्रचारासाठी पुरेसा निधी दिला नाही. मोहंती …

Read More »

लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात ६०.९६ टक्के मतदान

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच …

Read More »

लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू

  दरभंगा : बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस …

Read More »

ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर आज अखेर सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम-व्हीव्हीपॅटविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल दिला. या सर्व याचिका फेटाळून लानताना न्यायालयाने मतदान ईव्हीएमवरच होईल, असं स्पष्ट केलं. खंडपीठाने दोन निकाल दिले असून एकमत मात्र …

Read More »

“मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन”, भारत सरकारला अमेरिकेने दाखवला आरसा

  नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे लोकशाही आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर सातत्याने सर्वोच्च स्तरावर सल्लामसलत करत असल्याचं वक्तव्य अमेरिकेच्या ब्युरो ऑफ डेमोक्रसी ह्युमन राइट्स अँड लेबर विभातील वरिष्ठ अधिकारी रॉबर्ट एस. गिलख्रिस्ट यांनी केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी (२२ एप्रिल) मानवाधिकार प्रॅक्टिसेसवरील (मानवी हक्कांबाबतचा) राष्ट्रनिहाय …

Read More »

लोकसभा निवडणूक 2024 : पहिल्या टप्प्यात तब्बल 60 टक्के मतदान

  नवी दिल्ली : देशातील 21 राज्यांतील 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल 60 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये 25 पेक्षाही अधिक लोक जखमी झाल्याचे कळते. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर …

Read More »

विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

  तेलंगणा : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या त्यानंतर संतप्त जमावाने शाळेवर हल्ला केला आहे. जमावाने शाळेत तोडफोड केली, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांना जबर मारहाणही केली. संतप्त जमाव शाळेत घुसून …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक

  कोलकाता : रामनवमीनिमित्त देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, या जल्लोषाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील शक्तीपूर परिसरात हा हिंसाचार घडला. यामुळे या भागात १४४ कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यानुसार, मिरवणुकीत …

Read More »

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, जगनमोहन रेड्डी जखमी

  अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगर परिसरात प्रचार करत होते. यावेळी गर्दीतील अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडाने जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याचा वेध घेतला. दगड लागल्याने जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याला …

Read More »