नवी दिल्ली : चीन आणि शेजारील देशांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल. जर या देशांतून आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास अथवा त्यांची कोविड १९ …
Read More »सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू
सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. …
Read More »बसवराज बोम्मईं विरोधात खासदार धैर्यशील मानेंकडून थेट पीएम मोदींकडे तक्रार
नवी दिल्ली : सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादात तेल ओतत असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची खासदार धैर्यशील माने यांनी थेट पीएम मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धैर्यशील माने यांनी आज पंतप्रधानांची भेट घेत बोम्मई सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत सगळा विषय त्यांच्या कानी घातला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या …
Read More »आम्ही देशासाठी बलिदान दिलं, तुमचा कुत्रा तरी मेला का?
मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपावर हल्लाबोल नवी दिल्ली : आम्ही (काँग्रेसने) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे …
Read More »बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणार्यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणार्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली …
Read More »महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं नाही, मीच त्यांना आमंत्रण देणार
बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. …
Read More »सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …
Read More »बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. छपरा येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत …
Read More »श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta