Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

म. ए. समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि माजी आमदार …

Read More »

मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात : प्रमोद मुतालिक

बेळगाव : मशिदीतील नमाजमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी गंभीर आरोप केले आहेत की हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण थांबवण्याचे आदेश देऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. रात्री …

Read More »

दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …

Read More »

बॅ. नाथ पै यांच्या कार्यावर उद्या व्याख्यान

बेळगाव : प्रगतशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिवंगत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह

बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग …

Read More »

वृक्षतोडीच्या विरोधात वनाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे तोडण्यास सार्वजनिक आक्षेप घेण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन सहाय्यक वन संरक्षणाधिकार्‍यांना सादर करण्यात आले आहे. बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या …

Read More »

एअरमन ट्रेनिंग स्कूलने केले सुवर्ण विजय वर्ष साजरे

बेळगाव : बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे भारतीय सशस्त्र दलांनी 1971 सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या सभागृहात एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल …

Read More »

‘विजय ज्योती’चे लष्करी इतमामात स्वागत!

बेळगाव : पंतप्रधानांनी गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी अमर जवान ज्योतीने प्रज्वलित केलेल्या 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेल्या ‘विजय ज्योती’चे बेळगावची शान असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे हर्षोल्हासात लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. एमएलआयआरसी येथे विजय ज्योतीचे आगमन …

Read More »

पाठ्यपुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा

खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …

Read More »

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत हटवावे

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्यविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा घालण्यात आला आहे त्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना आज मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी …

Read More »