Sunday , December 7 2025
Breaking News

बेळगाव

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर व्याख्यानाचे आयोजन; ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ सीमा भागातील शिक्षक बांधवांसाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘मुलांच्या विवेकी जडणघडणीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावरचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ …

Read More »

बेळगाव विधानसभेचे हिवाळी अधिवेशन: आवश्यक तयारीसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश

  बेळगाव : येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. अधिवेशन काळात वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, भोजन त्याचप्रमाणे संपर्क सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनात उत्तम प्रकारे आयोजन व्हावे …

Read More »

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव पार पडला

  बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली. कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरा अध्यक्ष राहुल कुरणे व प्रमुख उपस्थित मान्यवर अमित देसाई यांच्या हस्ते विशेष रुद्र अभिषेक कालभैरव स्तोत्र पठण केले. त्या नंतर विशेष पुषअर्चना …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे उत्साहात संपन्न झाल्या. 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी कथाकारांची निवड करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक गटाच्या कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव पी. पी. बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

विजेच्या खांबाला कारची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

  बैलहोंगल तालुक्यातील घटना बैलहोंगल : कार चालकाचा ताबा सुटून कार थेट विजेच्या खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अतिक (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात ही घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अपघाताच्यावेळी बेळगावहून बैलहोंगलच्या दिशेने निघालेल्या या …

Read More »

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सव थाटामाटात संपन्न

  राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे विविध स्पर्धांचे आयोजन; सर्वसाधारण विजेते पद जीआय महाविद्यालय बेळगाव बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि साहित्य असा होता. या साहित्य …

Read More »

आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ पुरस्कार प्रदान

  बेळगाव : पुणे येथील स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुपतर्फे आयोजित ‘भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ वितरण कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऊर्मिला कोठारे उपस्थित होत्या. लोकरीच्या विणकामात अभिनव डिझाईन, कल्पनांची आणि निटवेअर उद्योगातील उल्लेखनीय …

Read More »

शहापुरात श्री काळभैरवनाथ जयंती भक्तीभावात साजरी

  बेळगाव : नाथ पै. चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात आज बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंती भक्तिभावात साजरी करण्यात आली. श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त काल मंगळवारी सायंकाळी होम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज शनिवारी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी बारा …

Read More »

मच्छे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा

  बेळगाव : मच्छे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे महापौर मंगेश पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा पंचायत सदस्य, शिक्षण व आरोग्य स्थायी कमिटी अध्यक्ष रमेश गोरल, तसेच निवृत्त जवान नंदू अनगोळकर, देवस्थान पंच कमिटी सदस्य नागेश गुंडोळकर, …

Read More »

बेनकनहळ्ळी गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; 10 जण अटकेत

  बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावाच्या हद्दीतील खुल्या जागेत जुगारी अड्ड्यावर मंगळवारी मध्यरात्री 3.30 वाजता बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 10 जुगाऱ्यांना अटक केली. तसेच 53600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेले संतोष परमार (रा. नानावाडी, बेळगाव), सुरेश अनगोळकर (रा. पाटील गल्ली, बेळगाव), बाबू …

Read More »