Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबतची सेल्फी पोलिस निरीक्षकांच्या अडचणीची

  बेळगाव : म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वाचा मोह पोलिस निरीक्षक कालिमिर्ची यांनादेखील आवरला नसून शेळके यांच्यासोबत सेल्फी काढल्याने निरीक्षक कालिमिर्ची यांनी कानडी लोकांचा तीव्र रोष ओढवून घेतला आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या वेळी ‘काळा दिवस’ साजरा करण्यासाठी म. ए. समितीला परवानगी नाकारल्याबद्दल कानडी नागरिक आधीच जिल्हा प्रशासनावर …

Read More »

राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान चाकू हल्ला; सहा जण जखमी

  बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरातील सदाशिव नगर परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी तिघांना बीम्स रुग्णालयात तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बेळगावातील सदाशिवनगर परिसरात …

Read More »

दडपशाहीला भीक न घालता “काळ्या दिनी” मराठी भाषिकांचा एल्गार!

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा “काळा दिन” म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात येते. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी …

Read More »

कन्नड राज्योत्सवाच्या पथसंचलनावेळी पालकमंत्र्यांच्या वाहनातून डिझेल गळती

  बेळगाव : आज बेळगावमध्ये कर्नाटक राज्योत्सव जिल्हा स्तरावर साजरा होत असताना पथसंचलन सुरू होते. याच दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी ज्या वाहनातून संचलन पाहण्यासाठी जात होते, त्या जीपमधून डिझेल गळती सुरू झाली. तातडीने तेथे उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर कंट्रोल गॅसची फवारणी करून पुढील मोठा अनर्थ टाळला. बेळगावमध्ये सुरू …

Read More »

….म्हणे समिती भाडोत्री कार्यकर्त्यांना जमवून काळा दिन पाळते; आमदार लक्ष्मण सवदी यांचे वादग्रस्त वक्तव्य

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी तोंडसुख घेत महाराष्ट्र एकीकरण समितीने जर बेळगाव मागितल्यास आपण मुंबई मागू असे बेताल वक्तव्य करून मराठी भाषिकांचा रोष ओढवून घेतला आहे. शनिवारी अथणी येथे माध्यमांशी बोलताना आम. लक्ष्मण सवदी म्हणाले, म. ए. समितीने बेळगावची मागणी बंद करावी. जर त्यांनी हि …

Read More »

खासदार धैर्यशील माने यांना कोगनोळी टोलनाक्यावर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन

  निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि. १ नोव्हेंबर) तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र, कर्नाटक पोलिस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले, त्यामुळे काही काळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण …

Read More »

बेळवट्टी उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय

  बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे, बाबूराव पाटील यांनी जुलै २०२४ मध्ये उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सदस्यांना विश्वासात …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामाची कॉलम भरणी

  बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामाच्या कॉलम भरणीचा कार्यक्रम आज शुक्रवारी पार पडला. पत्रकार श्रीकांत काकतीकर यांच्या हस्ते कॉलम भरणे आणि पूजा करण्यात आली. सदर कामासंदर्भात माहिती देताना विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी म्हणाले, दिवंगत केंद्रीय …

Read More »

समीक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची बुद्धिबळपटू समिक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समिक्षा भोसले हिने 4 गुणास आपली निवड सार्थ ठरविली आहे,आता यादगिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. शाळेचे अध्यक्ष …

Read More »

भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता त्यांची पुढील आठवड्यात तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी 21 शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त …

Read More »