Monday , September 21 2026
Breaking News

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना

Spread the love

 

बेळगाव : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यावरच आपण परदेशी जातो, नोकरी करतो असा समज बाळगतो. पण मातृभाषेतून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी जाता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कु. प्रतीक्षा भादवणकर.

भारत नगर 6 वा क्रॉस शहापूर, येथील कु. प्रतीक्षा पांडुरंग भादवणकर ही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी एमएससी उच्चशिक्षण घेण्यासाठी ग्रीनविच युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे रवाना होत आहे,

गोमटेश विद्यापीठातून मराठीतून शिक्षण घेऊन पियुसी व बीबीए पदवी गोगटे कॉमर्स कॉलेजमधून घेऊन, पुढील एमएससीच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला बेंगळुरू मार्गे रवाना होत आहे. मराठा समाजातील या युवतीला पुढील वाटचालीसाठी एस. एम. खन्नूकर कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खन्नूकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *