Sunday , July 26 2026
Breaking News

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रभाकर कोरे यांचे किरण जाधव यांच्याकडून गौरव

Spread the love

 

बेळगाव : आरोग्य क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानानिमित्त भाजप नेते किरण जाधव यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी बोलताना भाजप नेते किरण जाधव म्हणाले की, डॉ. प्रभाकर कोरे यांनी आरोग्य सेवेबरोबरच शिक्षण आणि समाज कल्याण क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय असून देशातील अनेक होतकरू तरुणांना प्रेरणादायी आहे. हजारो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणारे असे कोरे यांचे कार्य ठरले आहे त्यांची दूरदृष्टी सेवाभाव आणि राष्ट्रहितासाठीची बांधिलकी यामुळेच त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना किरण जाधव म्हणाले की, डॉक्टर कोरे यांच्या कार्याचा गौरव हा उल्लेखनीय आहे त्यांचे कार्य हे केवळ एका संस्थेत पुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे. पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन सेवेची पोचपावती आहे. भाजप कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *