Sunday , December 7 2025
Breaking News

बेळगाव

विजेचा धक्का लागून कंग्राळी खुर्दच्या तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बंबरगे गावात पावसादरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल विवेकानंद उर्फ लालू जाधव (वय ४३ रा.रामनगर, कंग्राळी खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अमोल जाधव यांचे बंबरगे येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास …

Read More »

शहर म. ए. समितीची बैठक रविवारी

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 मिनिटांनी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. दीपक …

Read More »

१ नोव्हेंबर २०२३ काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बेळगाव : 1 नोव्हेंबर 2023 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर भारतीय दंड सहित कलम 142, ,147,153,290 सह कलम 149 प्रमाणे त्यांच्या …

Read More »

बेळगावमार्गे बंगळुर – मुंबई नवीन सुपरफास्ट ट्रेनला मंजुरी

  बंगळूर : कर्नाटकातील लोकांकडून मागणी असलेल्या बहुप्रतिक्षित बंगळुर-मुंबई सुपर फास्ट नवीन ट्रेनला केंद्रीय मंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे पत्र लिहिले आहे. ट्रेनची धावण्याची तारीख आणि अधिकृत वेळापत्रक लवकरच निश्चित केली जाईल. गेल्या ३० वर्षांपासून, बंगळुर ते मुंबईला जोडणारी उद्यान एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे. ही ट्रेन बंगळुरहून गुंटकल-सोलापूर मार्गावर धावते. …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थान व सौ. लक्ष्मी जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या ‘वैकुंठ धाम रथा”चे प. पू. हरिभाऊ महाराज रुद्र केसरी मठ यांच्या हस्ते लोकार्पण!

  बेळगाव : श्री व सौ. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर व श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने ‘वैकुंठ धाम रथ’ या समाजोपयोगी उपक्रमाचे अनावरण सोहळा नुकताच श्री क्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर देवस्थान येथे पार पडला. या प्रसंगी श्री परम पूज्य हरिभाऊ महाराज रुद्र केसरी मठ सेवा समिती, महालक्ष्मी नगर, बेळगाव यांच्या शुभहस्ते …

Read More »

कावळेवाडीत गुणवंत कब्बडी खेळाडूंचा सन्मान

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बेळवट्टी हायस्कूलच्या गुणवंत कब्बडी खेळाडूंचा दीपावलीच्या शुभदिनी सन्मान करण्यात आला. बेळवट्टी हायस्कूलच्या चौदा वर्षांखालील मुलींचा कब्बडी संघ बेळगाव जिल्ह्यात अव्वल ठरला. विभागीय स्तरावर दमदार धडक मारुन बेळगाव पश्चिम भागांत आपला नावलौकिक वाढविला आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून नारीशक्ती खेळात …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यतत्परतेमुळे ऐन दिवाळीत एक मोठा अनर्थ टळला!

  बेळगाव : काल बुधवारी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना बेळगाव बसवान गल्ली येथे उघड्यावर वीजेची तार पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकरते पद्मप्रसाद हुली (एच ई आर एफ) यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थितीची पाहणी करून सदर माहिती (के ई बी) कार्यालय आणि खडेबाजार पोलिस स्टेशनला कळवली. या …

Read More »

‘अंदर बहार’ जुगार खेळणाऱ्या पाच जणांना एपीएमसी पोलिसांकडून अटक

  बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका कारवाईत, एपीएमसी मार्केट यार्ड बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी रोख रकमेचा पणाला लावून ‘अंदर बहार’ नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तत्ती आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून विनायक सोनरवाडी, सिद्धार्थ नागानूर, शिवानंद उगरखोडा, …

Read More »

कंडक्टर पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी पती अटकेत!

  बेळगाव पोलिसांनी सौन्दत्ती येथे कंडक्टर पत्नीचा खून करून फरार झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात यश मिळवले आहे. सौन्दत्ती येथे घटस्फोट घेतलेल्या पत्नीचा पोलीस कॉन्स्टेबलने निर्घृण खून केल्याच्या प्रकरणासंदर्भात आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सौन्दत्ती येथे कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या काशव्वावर …

Read More »

बेळगावात धोकादायक मांजा विक्रीवर पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरात बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी हानीकारक मांजा धाग्याच्या विक्रीवर कायदेशीर कारवाई केली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हानीकारक मांजा धाग्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या गळ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या धाग्याच्या विक्रीवर कारवाई करण्याचे …

Read More »