बेळगाव : विद्यानगर बॉक्साईट रोड येथील आधार शिक्षण संस्थेमध्ये श्री धन्वंतरी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रम विभागांच्या वतीने धन्वंतरी पूजन करून याचे महत्त्व सांगण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी यावेळी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व सांगितले. धनत्रयोदशीचा दिवस हा धनाची पूजा करण्याचा दिवस …
Read More »रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रम
बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना बेळगावला भेट दिली होती. या घटनेला १३३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंदानी बेळगावातील रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी तीन दिवस वास्तव्य केले होते. आता भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे.स्वामीजीनी …
Read More »बेळगावात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरणाऱ्या मिशन ऑलंपिक संघटनेविषयी
बेळगाव : ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक’ यांच्या वतीने बेळगाव येथे भव्य ‘मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ, बेळगाव येथे होणार आहे. विविध खेळांतील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन …
Read More »एमएलआयआरसीतर्फे ‘इन्फंट्री डे’ निमित्त ‘शौर्यवीर रन’चे आयोजन
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) यांनी ‘शौर्यवीर रन २०२५’ या भव्य सामुदायिक धावण्याच्या स्पर्धेची घोषणा केली आहे. भारतीय लष्कराच्या ७९ व्या पायदळ दिन निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा केवळ एक रन नसून, भारतीय पायदळाच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला दिलेली ही मनस्वी मानवंदना आहे. …
Read More »कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व : सौ. शकुंतला बिरजे
माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय.. ——————– सौ. शकुंतला अनिल बिरजे हिचा जन्म १९५४ मध्ये गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पार्वती व शंकरराव ईराप्पा पाटील यांच्या पोटी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक …
Read More »एच. के. पाटील यांचे महाजन अहवालाचे तुणतुणे कायम; म्हणे सीमाप्रश्न संपला!
बेळगाव : कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत सीमा प्रश्न संपल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक नोव्हेंबर राज्योत्सव दिन हा केवळ भाषिक नव्हे तर कर्नाटक राज्याचा गौरवशाली उत्सव आहे. कन्नड संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी सरकार सर्वतोपरी …
Read More »बेळगावला “दुसरी राजधानी” घोषित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
बेळगाव : बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने ही मागणी उचलून धरली असून लवकरात लवकर सुवर्णसौधच्या शेजारी प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात यावा अन्यथा एक नोव्हेंबर रोजी थेट धरणे आंदोलन करण्याचा इशारा उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने सरकारला …
Read More »खासदार जगदीश शेट्टरांनी मराठी भाषिकांवर ओकली गरळ!
बेळगाव : एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन असल्याने या दिवशी कोणीही काळा दिन आचरणात आणू नये तर कर्नाटक राज्यातील सर्वांनीच एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा करावा अशी गरळ ओकली. मराठी भाषिकांच्या मतांवरच निवडून येऊन खासदारकी भूषवणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर यांनी आपला मराठी द्वेष्ट्येपणा दाखवून दिला आहे. सीमाभागातील …
Read More »शुभम शेळके यांच्यावर पुन्हा पोलिसांची वक्रदृष्टी!
बेळगाव : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत माळ मारुती पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी शुभम शेळके यांचा मोबाईल आणि कार जप्त केली होती. जप्त केलेला मोबाईल आणि कार परत आणण्यासाठी शुभम शेळके आज माळ मारुती …
Read More »1 नोव्हेंबर 2024 काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 45 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta