Sunday , July 26 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या मारहाणीत आठवीत शिकणारा विद्यार्थी जखमी

Spread the love

 

बेळगाव : एका विद्यार्थ्यावर वरिष्ठ वर्गातील मुलांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील कॅम्प परिसरातील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये बुधवारी घडली. मारहाणीत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या इब्राहिम आगा (वय १४) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी विद्यार्थी इब्राहिम आगा याने दिलेल्या माहितीनुसार “मी शाळेच्या मधल्या सुट्टीत पायऱ्यांवरून जात होतो, तेव्हा दहावीच्या काही मुलांनी मला विनाकारण मागे खेचले. मी त्यांना जाब विचारला असता, त्यांनी मला मारहाण सुरू केली. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर स्टीलची बाटली जोरात मारली. यात आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा सर्व प्रकार शाळेच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी घडला,” असे जखमी इब्राहिमने रुग्णालयातून सांगितले.
इब्राहिमच्या वडिलांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “दहा ते बारा मुलांच्या टोळीने माझ्या मुलावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला आहे. त्याच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
सदर घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाळेकडे दाद मागितली असता, “शाळेबाहेर घडलेल्या घटनेची जबाबदारी आमची नाही,” असे उत्तर देऊन प्रशासनाने हात वर केल्याचे वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
कॅम्प पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी इब्राहिमचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *