Sunday , July 26 2026
Breaking News

ममदापूरमधील भाजपच्या सरिता पाटील यांचा कार्यकर्त्यांसह उत्तम पाटील गटात प्रवेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ममदापूर (केएल) येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपच्या माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा सरिता संतोष पाटील, संतोष पाटील यांनी आपल्या सहकारी समर्थक, कार्यकर्त्यांसह सहकाररत्न उत्तम पाटील गटात अधिकृत जाहीर प्रवेश केला. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षप्रवेशाबद्दल सरिता पाटील, संतोष पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने, नव्या उर्जेसह परिवर्तनाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकावेत. कार्यकर्ते आणि मतदारांच्या विश्वासावरच तालुक्याचे भविष्य उज्वल बनणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीची ताकद दाखविण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, सदस्य निरंजन पाटील- सरकार, संजय मधाळे, आकाश मधाळे, अनिल गोरवाडे, प्रभाकर शिरगन्नावर, संजय पाटील, सर्जेराव पाटील, रोहित लोहार, अर्जुन लोहार, विजय पाटील, बसवराज स्वामीयांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *