बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत अध्यक्ष आर आर पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कारखाना सुरू होण्यात अनिश्चितता दिसून येत आहे. अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांच्या नाराजीचा परिणाम थेट कारखान्याच्या कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्कंडेय साखर कारखाना सुरू नसल्याने बँकांचे कर्जही थकले …
Read More »सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागारपदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती
बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी मदत करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्यावतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्र सरकारकडे साक्षीदारांच्या तयारीसाठी दाव्याची माहिती असलेले माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची …
Read More »3500 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यासाठी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटसमोर शेतकऱ्यांचे गेटबंद आंदोलन
बेळगाव : महाराष्ट्र राज्यात ऊसाला 3500 इतका दर निश्चित करण्यात आला आहे मात्र कर्नाटक राज्यात ऊसाला केवळ तीन हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात देखील 3500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि शेतकऱ्यांनी आज निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे गेट …
Read More »साखर कारखान्यांनी प्रति टन ४ हजार रुपये दर दिल्याशिवाय ऊसाची कांडी तोडू देणार नाही
कर्नाटक राज्य रयत संघटनेचा इशारा; बेळगाव निजलिंगाप्पा साखर कार्यालयात बैठक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रति टन ४ हजार रुपये दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार असल्याचा इशारा कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. गुरुवारी बेळगाव येथील निजलिंगअप्पा साखर कार्यालयात कर्नाटक …
Read More »पी.डी.ओ. यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये निदर्शने
बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथील पंचायत विकास अधिकारी (पी.डी.ओ.) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य पंचायत विकास अधिकारी कल्याणकारी संघटनेने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून आज संघटनेच्या वतीने बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये जागृती मंच उद्घाटन सोहळा संपन्न
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये समाजभान जपण्यासाठी जागृती मंच स्थापन करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजीदादा कागणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ या स्फूर्तीगीताने संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या मार्गदर्शनाने आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले. …
Read More »कणेरी मठाच्या स्वामींना विजयपूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून प्रवेश बंदी
विजयपूर (दिपक शिंत्रे) : अलीकडे एका कार्यक्रमात कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी बसव संस्कृती अभियान आणि लिंगायत मठाधीशांबद्दल अपमानास्पद व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, निषेध आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्वामीजींना 14 डिसेंबर पर्यंत, म्हणजे दोन …
Read More »“त्या” शिक्षिकेकडून दिलगिरी व्यक्त!
बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभा करून शिक्षा दिलेल्या “त्या” शिक्षिकेने आज झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. सदर प्रकरण भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत …
Read More »माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांचा आज अमृतमहोत्सव सोहळा!
बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन आज दि. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री …
Read More »खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या : खा. जगदीश शेट्टर
बेळगाव : न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव ए.पी.एम.सी.च्या सचिवांना दिले. परवाना रद्द झालेल्या ‘जय किसान’ भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी बेळगाव ए.पी.एम.सी.मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जागा, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta