Monday , September 21 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी,प्रा. अशोक आलगोडी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व विठ्ठल पोलो उपस्थित होते.
यावेळी प्रा. आलगोडी यांनी सामाजिक विषयांवर, वर्तमान स्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता व विडंबन कविता सादर केल्या. त्यानी सादर केलेली ‘कवी असल्याचे दुख पहिल्यांदाच बोचले’ व बापाची वेदना व त्याग सांगणारी ‘उपेक्षित बाप’ या कविता दाद घेऊन गेल्या.
यावेळी मीना कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली. तर सुरेश प्रभू खानोलकर, रविंद्रनाथ जुवळी, विजय वाईगडे, प्रकाश कुडतरकर,  अश्विनी पाटील, विजय बांदिवडेकर, विजयमाला पाटील, नारायण कोरडे, आर. जी. कुंभोजकर, उषादेवी महिंद्रकर व अशोक लोकूर यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार शिवराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर आभार विठ्ठल पोलो यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *