बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्व- स्वरूप संप्रदायच्या वतीने रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी वडगांव ते जुने बेळगांव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन केले आहे. “अनंत विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी” यांच्या दिव्य प्रेरणेने …
Read More »चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात शनिवार दिनांक 29/3/2025 रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत विजया ऑर्थो अँड ट्रुम सेंटर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रवी पाटील व बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्लीतर्फे संयुक्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 6 ते …
Read More »संपगाव परिसरात बिबट्याचा वावर, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील संपगाव आजूबाजूच्या मुतली परिसरात एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वन विभागाच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नजरेत आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संपगाव व पट्टीहाळ गावात बिबट्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. बिबट्याने संपगाव जवळ कुत्रा आणि कोल्ह्याची शिकार केल्याची माहिती समोर …
Read More »वीज कोसळून एकाचा मृत्यू; बैलहोंगल येथील घटना
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील सुतगट्टी गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बसवराजा नागप्पा सांगोळ्ळी (४५) असे मृताचे नाव आहे. बसवराज यांच्या पत्नीसह अन्य दोघे जखमी झाले. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना वीज पडल्याने ही …
Read More »बसवराज यत्नाळ यांच्या हकालपट्टीबाबत हायकमांडशी चर्चा करणार : रमेश जारकीहोळी
बेळगाव : मला वाटले नव्हते की, हायकमांड बसवराज पाटील- यत्नाळांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतील. मी हायकमांड तसेच वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा करून यत्नाळांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करणार आहे, असे मनोगत माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, यत्नाळ यांच्या …
Read More »पाण्याची पाईपलाईन बदलण्याची आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील रहिवाशांची मागणी
बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील पिण्याच्या पाण्याची जुनी पाईप लाईन बदलून त्या ठिकाणी नवी मोठ्या आकाराची पाईपलाईन घालावी जेणेकरुन पाणी पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशा मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे महापौर मंगेश पवार यांच्याकडे दिले. आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील रहिवासी …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण वतीने उत्कृष्ट कार्याचा सन्मान
बेळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे तर समाजावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी व्यावसायिक उत्कृष्टता सेवा पुरस्कारांचे आयोजन केले. या समारंभात प्रामाणिकपणा, समर्पण आणि सेवेच्या भावनेने इतरांना उंचावण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षीचे पुरस्कार विजेते असे श्रीमती …
Read More »संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून; पाटील मळा येथील घटना
बेळगाव : संपत्तीच्या वादातून वारंवार होत असलेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन पुतण्याने स्वतःच्या काकाचा जांबीयाने भोसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ माजली आहे. अनिल शरद धामणेकर (वय 46) रा. पाटील मळा बेळगाव असे ठार झालेल्या मयताचे नाव आहे. मिळालेली अधिक माहिती …
Read More »समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना जामीन मंजूर
बेळगाव : कन्नडधार्जिण्या पोडिओशी मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरलेल्या किणये येथील तरुणाचा सत्कार केल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कानडी संघटनांच्या दबावामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आज शुभम शेळके यांना जामीन मंजूर झाला. त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका झाली. यावेळी नगरसेवक …
Read More »हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, …
Read More »