Sunday , July 26 2026
Breaking News

अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई; दोघांना घेतले ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव पोलिसांनी अवैध कारवायांविरुद्ध विशेष मोहीम उघडली असून, उद्यमबाग आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत अवैध दारूविक्री करणाऱ्यासह सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण होनकट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मजगाव येथील अरुण इंजिनिअरिंग फॅक्टरीजवळ छापा टाकला. यावेळी केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेल्या मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या परमेश्वर देवप्पा नाईक याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४,७५० रुपये किमतीच्या १२ लिटर विदेशी मद्यसाठ्यासह ३,३६० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध अबकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्यमबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या एका कारवाईत, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय लक्कप्पा जोडट्टी यांच्या पथकाने राजहंसगड किल्ल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या सातेरी महादेव ओवुळकर याला ताब्यात घेतले. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ८,११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यशस्वी कामगिरी करणाऱ्या या पथकांचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *