Sunday , July 26 2026
Breaking News

गोरल क्लासिक येळ्ळूर शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन व मेणसे फिटनेस क्लब येळ्ळूर यांच्यावतीने रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वा. गोरल क्लासिक येळ्ळूर ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संयुक्त महाराष्ट्र चौक, गोरल गल्ली, येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत पातळीवरील येळ्ळूर क्लासिक टॉप ५ आणि जीम स्तरीय मेणसे फिटनेस टॉप टेन या स्पर्धाही होणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतील किताब विजेत्याला ५,५५५ रुपये तर बेस्ट पोझरला एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व ८० वरील गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांक विजेत्यांन अनुक्रमे ३,०००, २,५००, २,०००, १,५००, १,००० रूपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, मयूर मेणसे, उमेश सांबरेकर यांच्याशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *