Monday , September 21 2026
Breaking News

साखरवाडीतील नूतन मारुती मंदिरात मूर्तीची भाविकांच्या उपस्थितीत पुनर्रप्रतिष्ठापना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी ( ता. २५) सुरुवात झाली होती. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी (ता.२६) माजी नगरसेवक दिलीप पठाडे व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत पुनर्रप्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी महेश यरनाळकर व सहकाऱ्यांच्या पौरोहित्याखाली माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, मनीषा जासूद, प्रथमेश जासूद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होम हवन व मूर्ती पूजन झाले. त्यानंतर साखरवाडी आणि परिसरातील महिलांनी सर्वाधिक मिरवणुकीने दुरड्या आणल्या होत्या. त्यानंतर पूजा अर्चा व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. साखरवाडी समाजाचे प्रमुख चंद्रकांत जासूद यांनी मंदिराचे बांधकाम करून मूर्तीची पुनर्रप्रतिष्ठापना केल्याबद्दल सहकार्यातून उत्तम पाटील यांच्या हस्ते जासुद यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार शशिकला शशिकला जोल्ले यांनी मंदिरास भेट देऊन पुढील बांधकामासाठी निधी देण्याची ग्वाही दिली. बांधकामासह कळसारोण समारंभ होणार असून भाविक आणि दानशूर व्यक्तींनी मंदिरासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन जासूद यांनी केले.
गुरुवारी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, पंकज पाटील, सुप्रिया पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, रवींद्र कदम, माजी सभापती सुनील पाटील, जयवंत भाटले, राजु गुंदेशा, सुजय पाटील, राजेश कोठडिया, विजय शेटके, प्रशांत नाईक, संदीप येरुडकर, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, हर्षा शेट्टी, गोपाळ नाईक, किरण कोकरे यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *