Monday , September 21 2026
Breaking News

मानवी हृदय, घातांकांचे नियम, चेतन पेशीसह बरेच काही

Spread the love

 

सन्मती विद्यालयात विविध वस्तूंचे प्रदर्शन; विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर शाळेत अभ्यास, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक विभागांमध्ये शैक्षणिक वर्षांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमपार पडला. याकार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान वस्तूप्रदर्शन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षांनी राजगोंडा पाटील तर मग पाहुणे म्हणून स्तवनिधी येथील गुरुकुल आश्रमाचे संचालक महावीर पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान वस्तू प्रदर्शनात मानवी हृदय, स्वयंचलित पाणीबचत, औद्योगिकरणामुळे होणारे प्रदूषण, कोलोग्राम, गणित प्रदर्शनात घातांकाचे नियम, बैजिक नित्य समीकरणे, रांगोळीमध्ये वनस्पती पेशी, उत्सर्जन संस्था, चेतन पेशीसह विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटून सर्वांची मने जिंकली.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी स्वागत केले. महावीर पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात गुंतून न राहता खेळाबरोबरच आपल्या कला कौशल्यांना वाव दिला पाहिजे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान महत्त्वाचे असून त्याकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.
पालक प्रतिनिधी डॉ. अश्विनी पाटील, संचालक महावीर पाटील, प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षिका एस. बी. बेळगुदरी, पी. एम. तोटे, एस. एन. रायनाडे, शीतल मगदूम, त्रिवेणी देसाई, उज्ज्वला पाटील, त्रिवेणी पाटील, श्रुती पाटील, सुकुमार मगदूम, दादा मगदूम आदी उपस्थित होत. सूत्रसंचालन एस. एन. रायनाडे यांनी केले. पी. एम. तोटद यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *