Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

चिंतामणराव हायस्कूलचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम २७ डिसेंबरपासून

  दोन दिवस चालणार; तीन हजारांवर माजी विद्यार्थ्यांचा सहभाग बेळगाव : शहापूरमधील चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलचा शताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रम शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि. २८) साजरा करण्यात येणार आहे. या शाळेत शिकलेले सुमारे तीन हजारहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार, खासदार जगदीश …

Read More »

नाताळच्या स्वागतासाठी बेळगाव नागरी सज्ज

  बेळगाव : संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. पार्श्वभूमीवर नाताळ सणाच्या आगमनासाठी बेळगाव शहर व परिसर सज्ज झाला आहे. खास करून बेळगाव येथील कॅम्प परिसरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण कॅम्प परिसर …

Read More »

निरंतर शिकत राहणे महत्त्वाचे : अभिनेते सचिन पिळगावकर यांचे प्रतिपादन

  बेळगाव : गरीब कुटुंबात जन्माला आलो. बालपणातच घरची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उच्चशिक्षित होता आले नाही. शिक्षण हातून सुटले की परत मिळत नाही. हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे. निरंतर शिकत राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन, जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बोलताना केले. कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय संकल्पना प्रतिकृती स्पर्धा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 22 डिसेंबर हा दिवस प्रसिद्ध भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला. यावेळी गणित विषयाला अनुसरून गणितातील कोडी, गणिती क्लृप्त्या, गणित जलद सोडविण्याच्या कल्पना, पाढ्यांची कल्पना, गणिताचे शैक्षणिक साहित्य, गणितातील कठीण भाग स्मरणात ठेवण्याच्या कल्पना, सूत्रे, भूमिती, बीजगणित यावर आधारित …

Read More »

सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवा; मुख्यमंत्री फडणवीस यांना म. ए. समितीचे स्मरणपत्र

  बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा स्मरण पत्र पाठवून उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, येत्या 21 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या …

Read More »

हिंडलगा कारागृहातील छाप्यात मोबाईल फोन जप्त

  बेळगाव : कारागृह प्रशासनाने हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात अचानक छापा टाकून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री १०.४० ते २३ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत ही तपासणी करण्यात आली. या झडतीदरम्यान, सर्कल क्रमांक एकमधील बॅरेक …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबीर

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अनगोळ राजहंस गल्ली येथील सद्गुरू सदानंद महाराज मठात रविवार दि. 28/12/2025 रोजी सकाळी 9 ते 2 वा पर्यंत करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याची परंपरा या संघटनेने कायम जपली असून त्याचाच एक भाग म्हणून …

Read More »

शिव बसव ज्योती होमिओपॅथिक विद्यार्थ्यांची नंदिनी प्रकल्पाला शैक्षणिक भेट

  बेळगांव (प्रतिनिधी) : येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या समूहाने नंदिनी दुग्ध प्रकल्पाला शैक्षणिक भेट दिली. कॉलेजमधील सामुदायिक औषधशास्त्र विभागाने नंदिनी दूध डेअरीला क्षेत्रभेट आयोजित केली होती. सामुदायिक औषधशास्त्र विभागाच्या सदस्यांनी बीएचएमएस अभ्यासक्रमातील तिसऱ्या वर्षाच्या ३५ विद्यार्थ्यांसोबत डेअरीला भेट दिली. डेअरीतील व्यवस्थापिका श्रीमती महालक्ष्मी …

Read More »

युवा शक्तीच्या जोरावर भारत विश्वगुरु : डॉ. मीना चंदावरकर यांचा विश्वास

  बेळगाव : योग्य नियोजन, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याची शिकवण याद्वारे बी.के मॉडल हायस्कूलने लाखो विद्यार्थी घडविले. या शाळेचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. या युवाशक्तीच्या जोरावरच भारत विश्वगुरू होणार आहे, असा विश्वास शिक्षणतज्ञ, कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मीना चंदावरकर यांनी बोलावून दाखवला. बी. के. …

Read More »

येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने संघटना बांधणीचे रणसिंग फुंकले

  येळ्ळूर : तळागळातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विभागवार बैठका घेवून समितीला बळकटी देण्याबरोबर दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी परमेश्वर मंदिर येथे विभागवार बैठक घेऊन संघटना बांधणीचे रणसिंग फुंकण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते बाबू यल्लापा कंग्राळकर होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक भाषणात सीमा चळवळीचा आढावा घेत मराठी जनतेने संघटीत …

Read More »