Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

मराठा समाजाच्या मठाच्या ठेवींवर “त्या” बँकेचा डोळा

  “त्या” बँकेच्या “दिग्गुभाई” अध्यक्षाचे प्रताप थांबता थांबेना झालेत. भ्रष्टाचाराचा कळस गाठून लाखोंची भानगड करून देखील भस्मासुराचे पोट काही भरले नाही अशी गोष्ट आता समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेळगावमधील एका मठाच्या ठेवींवरती “त्या” बँकेच्या अध्यक्षाची वाईट नजर पडलेली आहे. कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष हा अमर नसतो …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 …

Read More »

शहापूरात दोन गटात हाणामारी; तणावाचे वातावरण

    बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूर येथील आळवण गल्ली येथे लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले असून आज सायंकाळी सदर घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, लहान मुले क्रिकेट खेळत असताना किरकोळ भांडण झाले त्याचे रूपांतर हाणामारीत झाले नंतर परिसरात दगडफेक झाली. या घटनेत दोन …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

  बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव येथे मराठा बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष किरण मा. धामणेकर यांनी अधिक माहिती दिली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात …

Read More »

मच्छे-वाघवडे रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती; युवा समितीचा पाठपुरावा

  बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता, गेल्या २ वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले …

Read More »

मुलासमोरच पतीने केली पत्नीची हत्या; बैलहोंगल तालुक्यातील घटना

  बैलहोंगल : दारूच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला अमानुषपणे मारहाण करून जीवे मारल्याची संतापजनक घटना बैलहोंगल तालुक्यातील मानबरहट्टी गावात घडली. फकिरव्वा काकी (36) नामक महिला घरात झोपली असता दारूच्या नशेत असलेल्या पतीने झोपलेल्या पत्नीला तिच्या मुलांसमोर बेदम मारहाण केली त्यात फकिरव्वाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर यल्लाप्पा पळून गेला. नेसरगी पोलीस …

Read More »

शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांचे निधन

  बेळगाव : कर्नाटकातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्वार्थपणे अहोरात्र झटणाऱ्या तसेच हालगा-मच्छे बायपास आंदोलनात अग्रभागी असलेल्या शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांचे बुधवार दि. 22/5/2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. ऊसाला भाव, पिकांना आधारभूत किंमत, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता, नरेगा प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी, कामगारांना घरे यासाठी …

Read More »

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  गोव्यात २६ मे रोजी होणार सन्मान बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात व गोवा राज्यातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यल्लाप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »

अनगोळचा काळा तलाव विकासाच्या प्रतीक्षेत

  बेळगाव : अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तलावाच्या विकासासाठी कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या …

Read More »

जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 46 जणांची प्रकृती बिघडली

  सौंदत्ती : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने एकाच गावातील 46 जणांची प्रकृती बिघडली असून त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली असून भिरेश्वर येथील जत्रेत आंब्याचा तसेच घरी बनविलेला प्रसादाचे सेवन केल्यामुळे बुधवारी त्यातील 46 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ सौंदत्ती सार्वजनिक …

Read More »