Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०४ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सर्वोच्च त्याग करून मातृभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ब्रिगेडियर …

Read More »

म. ए. समिती नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सीमाप्रश्नाच्या खटल्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. स्वर्गीय एन. डी. पाटील यांच्या पत्नी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती …

Read More »

गियर हेड स्टुडिओचा शुभारंभ; सर्व प्रकारच्या सायकल एकाच छताखाली उपलब्ध

बेळगाव : हनुमान नगर जवळ बॉक्साइट रोडवरील गणश्री स्क्वेअर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या गियर हेड स्टुडिओ या सर्व प्रकारच्या सायकल विक्री शोरूमचे उद्घाटन कारंजी मठ बेळगावचे प. पु. गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून नुकतेच करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आर. एन. हारगुडे, कॅप्टन …

Read More »

प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन आजपासून

बेळगाव : प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन मराठी विद्यानिकेतनच्या आवारात शनिवारी (ता. २३) व रविवारी (ता.२४) आयोजित करण्यात आले आहे. भाई. एन. डी. पाटील साहित्यनगरीत हे संमेलन होणार आहे. चार सत्रास संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ट साहित्यिक राजा शिरगुप्पे भुषविणार आहेत. शनिवारी २३ रोजी सायंकाळी ५ …

Read More »

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी : प्राचार्य पी. बी. पाटील

प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा : सुट्टीच्या काळात वैचारिक मेजवानी : संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव : आज मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी चालत असलेला प्रयत्न तो यशस्वी केला जावा. यासाठी शासनाने विविध प्रकारचे सहकार्य करून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला …

Read More »

आरपीडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शनिवारी चर्चासत्र आयोजित केले होते. शहरातील राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयातील (आरपीडी) केएम गिरी सभागृहात शनिवारी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2021 : समग्र शिक्षण पद्धतीत बदल’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चन्नम्मा विद्यापीठाचे …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवारी समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी साउथचे अध्यक्ष अशोक नाईक, सचिव संतोष हत्तरकी, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पोतदार, जिल्हा स्पोर्ट्स इन्चार्ज महेश अनगोळकर, स्पर्धा …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यात दहा ठिकाणी स्मारक उभे करण्यात यावे, यासह वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावे यासाठी सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक आणि वस्तुसंग्रहालय तसेच संशोधन केंद्र निर्माण समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

Read More »

समर्थ नगर येथे पारायण सोहळ्यानिमित्त ग्रंथ दिंडी भक्तिभावात

बेळगाव : मेन रोड समर्थनगर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संप्रदायीक पारायण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी नुकतीच भक्तिभावाने पार पडली. शहरातील समर्थनगर मेन रोड येथे आज शनिवारपासून येत्या सोमवार दि. 25 एप्रिलपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त समर्थनगर परिसरात काल शुक्रवारी ग्रंथदिंडी …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडा

बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस …

Read More »