Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

बनावट योग उपकरणे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  बेळगाव : नऊ वर्षांपूर्वी आपल्या योग केंद्रात उपचारासाठी आलेल्या काही लोकांनी, उपकरणांचे गुपित चोरून तसेच बनावट उपकरणे तयार करून दुसरे योग केंद्र सुरू केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अशी की, भाग्यनगर, सातवा क्रॉस येथील रहिवासी उषा …

Read More »

मंत्री के. एन. राजण्णांना मंत्रिमंडळातून वगळल्याचा बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाच्यावतीने निषेध

  बेळगाव : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सांगण्यावरून काँग्रेस हायकमांडने मधुगिरीचे आमदार के. एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून अचानक वगळले, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले. बुधवारी बेळगावमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, “तुमकूर जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव असलेले आणि …

Read More »

गणेश विसर्जन विलंब टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांचा पाहणी दौरा

  बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षांपासून गणेश विसर्जनाला 36 तासाहून अधिक काळ लागत आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून यंदाच्या वर्षी तो विलंब कसा कमी करावा यासंदर्भात पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पाहणी दौरा केला. सर्वप्रथम कपिलेश्वर तलाव येथे पाहणी करून संभाजी उद्यान पासून त्यानंतर कपिलेश्वर …

Read More »

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर या संस्थेची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  सभासदांना 25% लाभांश जाहीर बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित या संस्थेची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल के कालकुंद्री सर, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हा. चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते झाले, तसेच दिपप्रज्वलन सर्व संचालक …

Read More »

तालुक्यातील खराब रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करा; अन्यथा रास्तारोको

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करावी. अन्यथा, रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. यावेळी, बेळगाव तालुक्यातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली, ज्याला अधिकाऱ्यांनी …

Read More »

भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत लव्ह डेल सेंट्रल स्कूल सर्वप्रथम तर लोकगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल प्रथम

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्य अतिथी महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर …

Read More »

सचिन पाटील यांचे आमरण उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच!

  बेळगाव : मुतगा (ता. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुतगा गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख, शेतकरी नेते सचिन पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे आमरण उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. आपल्या आंदोलनाबाबत बेळगाव वार्ता बोलताना सचिनदादा पाटील यांनी सांगितले की, मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये झालेल्या …

Read More »

पावसामुळे सौंदत्ती यल्लम्मा मंदिरातील हुंडीतील ओल्या झालेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

  सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसरात पावसाने थैमान घातले.  मंदिरात पाणी शिरले, त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासह मंदिरातील दानपेट्यांमध्येही पाणी साचले. यामुळे हुंडीतील नोटा आणि नाणी पूर्णपणे भिजून गेली. मंगळवारी दानपेटी उघडून त्यातील पाणी काढण्यात आले. देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या नोटा व नाणी वेगळ्या करून, धान्य वाळवण्याप्रमाणे मंदिराच्या आवारात उन्हात वाळत घालण्याची …

Read More »

शिवाजी विद्यापीठाची दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत प्रवेश प्रक्रिया; म. ए. समितीला विनंती

  बेळगाव : कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया उद्भवधन शिबिराचे आयोजन करण्याची विनंती शिवाजी विद्यापीठातर्फे महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावला करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत दूरशिक्षण माध्यमात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची कन्नड रक्षण वेदिकेने घेतली धास्ती; म्हणे मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जावे…

  बेळगाव : ऐन गणेशोत्सव काळात कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी विरोधी भूमिका मांडत भाषिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले गणेशोत्सव मंडळाचे स्वागत व शुभेच्छा फलक हटवण्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी द्वेष्टेपणा दाखवत शांतता भंग करण्यास सुरुवात …

Read More »