Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

बेळगाव शहर उपनगरात उद्या, परवा वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : हेस्कॉम दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ शहर व उपनगरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने पत्रकाद्वारे दिली आहे. शनिवारी दि. २१ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत राणी चनम्मा नगर …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती

  बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि २०२५ …

Read More »

बालकवींच्या कवितांनी रंगली काव्यमय संध्या; रसिकांची उत्स्फूर्त दाद

  बेळगाव : हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे, आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे, गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी अशा बहारदार कवितानी काव्यसंध्या रंगली. लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात सौ.सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके यानी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांवर आधारित …

Read More »

जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी उद्यानात गुरूवारी सायंकाळी गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांचा “स्वरांजली” सुगम संगीत कार्यक्रम झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संस्कृती खात्याच्या अधिकारी विद्यावती बजंत्री …

Read More »

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

  बेळगाव : आज 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी येळ्ळूर गावातील हिंदवी स्वराज्य युवा संघटना येळ्ळूरचे कार्यकर्ते, एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य व सदस्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. दिव्या संदिप कुंडेकर होत्या. पहिल्यांदा मान्यवरांचे पांढरी टोपी व पुष्प देऊन स्वागत व …

Read More »

गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधनीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दरवर्षी 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही या दिनाच्या औचित्याने प्रबोधिनी तर्फे ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठी माध्यमातून व्यवसाय व उद्योगाची उच्च …

Read More »

बेळगावच्या ‘सिटीस २.०’ योजनेला निधीची कात्री; १२५ कोटींचा आराखडा ७५ कोटींवर!

  बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘सिटीस २.०’ योजनेच्या निधीकपातीच्या निर्णयाचा निषेध करत राजकुमार टोपन्नवर, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद आणि वकील नितीन बोळबंदी यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शहराच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, हवामान बदलास तोंड देण्याची क्षमता आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी बेळगावची या राष्ट्रीय …

Read More »

नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : दिनांक 19/02/2026 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील …

Read More »

सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात

  बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी उद्यानात प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा निरंतर उदंड जयघोष करीत डॉ. टी. एम्. नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी शिवाजी उद्यानापासून …

Read More »

मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न; तपास सुरू

  बेळगाव : गुरुवारी रात्री उशिरा मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला काही अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ लावून अवमान करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून पुतळ्यावरील पदार्थाचा नमुना गोळा करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळापासून सुमारे १० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने पोलिस सीसीटीव्ही फुटेज …

Read More »