Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा

नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …

Read More »

कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली. दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या …

Read More »

जीएसटी कर कमी करावा; सेंटर टॅक्स आयुक्तांकडे बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी

बेळगाव : विणकरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगावमध्ये सध्या अवाजवी कर वाढीमुळे विणकर अडचणीत आले आहेत. पाच टक्के असणारा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने याचा मोठा फटका विणकरांना बसला आहे. कापड आणि पादत्राणांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत केल्याने उत्पादक आणि विक्रेते अडचणीत आले असून हा कर कमी करावा, अशी …

Read More »

क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती …

Read More »

कंग्राळी बुद्रुक परिसरातील भात पिके पाण्यात

बेळगाव : कंग्राळी बुद्रुकसह परिसरातीत अनेक गावातील कापलेली भातपीके रात्री व आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बी. के. कंग्राळी ग्राम पंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जवळपास गेला महिनाभर या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधून मधून …

Read More »

‘सुवर्णलक्ष्मी’ची वार्षिक सभा खेळीमेळीत

बेळगाव : श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संस्थेच्या गणेशपूर गल्ली शहापूर शाखा येथे नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासदन रविंद्र टोपाजिचे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर …

Read More »

बिजगर्णीत कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय

बेळगाव : बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त एक मार्च रोजी (२०२२) कुस्तीचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकित सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत लक्ष्मण अष्टेकर होते. यावेळी के. आर. भाष्कळ यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक …

Read More »

सरकारी मराठी शाळा नंबर 5 येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बेळगाव : मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली बेळगाव येथे झालेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दि. 2 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बार असोसिएशन बेळगावचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे …

Read More »

चंदगड तालुक्यातील दुर्गम काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना 10 सायकलींची भेट

चंदगड : चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुला-मुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल (7/8 किमी) चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर, अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची (15/16किमी) पायपीट ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून संपवली. याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा …

Read More »

आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आमरण उपोषण मागे

बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्‍यांनी आज मागे घेतले. मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. …

Read More »