खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्यावर पाणी आल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाला व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सर्वथरातून तसेच शहरवासीयातुन होत आहे.
जत-जांबोटी महामार्गावर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जांबोटी क्राॅसवर पाण्याचा साठा होत आहे.
समस्यांचे निवारण करण्यासाठी याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या क्राॅसवरील परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्गावर अंकूश नसल्याने जनतेच्या समस्यांना कोण जबाबदारी घेत नाही. याबद्दल तालुक्यातुन आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे सर्वच स्थरातुन नाराजीचे सुर उमटत आहेत.
