कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
सर्वप्रथम भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाचाळवीर जितेंद्र आव्हाडच करायचं काय……खाली डोक वर पाय, जितेंद्र आव्हाड कोण रे…..पायताण मारा दोन रे अशी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, भारतीय जनता पार्टीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला आहे तर काँग्रेस पक्षाने वारंवार अपमान करण्याचे काम केले आहे, त्याचबरोबर काल महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात सुद्धा या आव्हाडांनी मुंबई याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला होता. म्हणूनच भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत आहे. त्यामुळे अशा थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्या या आव्हाडांना जनता माफ करणार नाही. अशा या नतद्रष्ठ आणि स्टंट करणाऱ्या या आव्हाडांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या चुकीच्या कृतीला पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. जे काही हे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केले आहे हे जाणीवपूर्वक केले आहे. वेळोवेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम केले आहे याचे उत्तर जनता त्यांना देईल.
यावेळी भाजपा उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित नाना कदम, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आप्पा लाड, राजू मोरे, अमर साठे, दिग्विजय कालेकर, किरण नकाते, विशाल शिराळे, अभिजित शिंदे, विशाल शिराळकर, सुधीर देसाई, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, दिलीप मेत्रानी, संपत पोवार, प्रसाद पाटोळे, महादेव बिरंजे, अनिकेत अतिग्रे, विजय गायकवाड, दिलीप बोंद्रे, अवधूत भाट्ये, अमोल पालोजी, छाया साळोखे, रघुनाथ पाटील, दत्ता लोखंडे, संदीप वडगे, सयाजी आळवेकर, सुभाष माळी, लालासो पोवार, संजय पाटील, बंकट सूर्यवंशी, राजेंद्र वडगावकर, हर्शांक हरळीकर, बापू पोवार, अनिल कोळेकर, इक्बाल हकीम, सुरज सनदे, अमेय भालकर, रोहित करंडे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.