कोल्हापूर : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई (रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचा पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला.
याप्रकरणी देसाई यांची पत्नी तेजस्विनी व प्रियकर सचिन राऊत यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल आहे. तेजस्विनी देसाई हिला अटक केली आहे; तर राऊत याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता खुनाचे कलम वाढविण्यात येणार आहे. जवान देसाई यांच्यावर सोमवारी सकाळी ९ वाजता नूल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान देसाई यांचा मृत्यू झाल्याने यामध्ये खुनाचे कलम वाढविण्यात येणार असून नव्य फौजदारी प्रक्रियेनुसार १०३ कलम वाढवून न्यायालयासमोर सादन करण्यात येणार आहे, अशी माहिती गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली.
आता आशा प्रकारे विश्वास घात करणार्या विवाहित स्त्रीयांपासून वेळिच पुरूषांनी सतर्क राहू स्वतःचा बचाव करावा.
घोर कलियुग बाबा ।
नित्तीमत्ता ऐवढी कशी ढासळत चालली आहे ,”
“या जगात भारी असणार्या भारतीय संस्कारांची।”
फार हृदयस्पर्शी घटना.