खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सौंसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने शांतिनिकेतनमध्ये कोरोना केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ मे रोजी अवरोली माठादिष श्री चन्नबसव देवरू व रामदासजी महाराज तोपिनकट्टी यांच्या सानिध्यात झाले. अध्यक्षस्थानी विठ्ठल हलगेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीराव पाटील, सदानंद कपिलेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी किरण येळळुकर यांनी स्वागत केले तर सदानंद पाटील यांनी कोरोना केअर सेंटर विषयी माहिती दिली.
यावेळी सौ. धनश्री सरदेसाई, संजय कुबल, संभाजी राव पाटील, अभिलाष देसाई, सिद्धार्थ कपिलेश्वरी व इतरांनी विचार व्यक्त केले. शेवटी पंडित ओगले यांनी आभार मानले.
या कोरोना केअर सेंटरमध्ये ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश अथणीकर यांनी केले.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …