बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्प उपक्रमात सहभाग दर्शवण्यासाठी ब.कुडची विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढाकार घेवून युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सीमाभागातील प्रत्येक गावाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी झाडे लावावी आणि आपल्या बेळगावला जे गरिबांचे महाबळेश्वर अशी जुनी ओळख आहे ती पुन्हा मिळवून द्यावी, असे शुभम शेळके यांनी मत मांडले.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष अंकुश केसरकर, गुंडू कदम, सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी, जोतीबा पाटील, आकाश भेकणे, संकेत रवळुचे, महांतेश कोळुचे, ओमकार चौगुले, जोतिबा बेडका, गजानन कोळुचे, बसवंत बेडका, पप्पू खोकलेकर, शंकर मुचंडीकर, नागेश सुळेभावी, वरून बेडका, सचिन तारिहाळकर, अविनाश बेडका, सुरज तारिहाळकर, अजय मोदगेकर इतर युवा तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
