माजी मंत्री विरकुमार पाटील : आप्पाचीवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक
कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी येथील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निपाणी मतदार संघातून काकासाहेब पाटील हेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहेत. केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या साहेब, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे आपल्या सोबत आहेत.
यावेळेची निवडणूक काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकतीने लढणार आहे.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, प्रत्येक कामाची सुरुवात ही हालसिध्दनाथांच्या पावनभूमीतून आप्पाचीवाडी येथून केली. आप्पाचीवाडी गावाच्या विकासासाठी आपण कायमच प्रयत्न केले आहेत. काळमवाडी करार करून मतदार संघ सुजलाम सुफलाम केला. पूर्ण डोंगरभागात पिण्याच्या पाण्याची सोय केली. आपला पराभाव झाला नसता तर आणखी पाणी वाढवून घेऊन डोंगरभागातही शेतीसाठी पाणी पूर्तता केली असती. यावेळेची निवडणूक आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सर्व शक्तीने लढणार असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, बाबुराव खोत, विश्वास आबणे, कुमार कापसे, आप्पासाहेब पोटले, धनाजी पोटले, विशाल गंवडी, तानसेन खोत, भास्कर माने, मोहन पटेकर, रावसाहेब खोत, बाळासाहेब माने, दिलीप पटेकर, पप्पू गंवडी, शहाजी माने, मनीष माने, किसन बोते, हाल्लापा बोते, पिंटू माने, मोहन तेली, आप्पा हेलाटे, प्रदीप हेलाटे, कुमार खोत, गजानन खोत, आदेश आबणे, शिवाजी खोत, संभाजी खोत, ओंकार खोत, तानाजी,खोत, योगेश पोटले, सौरभ डंगे, प्रकाश कांबळे, दिनकर शेंनगावे, सुरेश शेंनगावे, ताय्यापा कांबळे, संभाजी कांबळे, शहाजी खोत, विक्रम देसाई, शिवाजी कितने, सुकुमार कगुडे तसेच काँग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
