रयत संघटनेकडून सरकारचा निषेध
कोगनोळी : रयत संघटनेचे पदाधिकारी बेळगाव येथील विधानसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशन ला घेराव घालण्यासाठी जाणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.
यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्या मागण्यासाठी जाणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करणे निंदनीय आहे. अधिवेशन सुरू असल्यापासून आपण विविध मागण्या केले आहेत पण याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. बेळगाव येथे सुरू असलेले अधिवेशन मंत्री व आमदार यांना गोवा फिरून मौज मजा करण्यासाठी आहे. शेतकरी व अन्य संघटना विविध मागण्या करत आहे याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. संघटनेला सरकारने विरोध केला तरी न्याय मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नाही अशी भूमिका यावेळी संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.
यावेळी निपाणी तालुका कार्याध्यक्ष रमेश पाटील, ढोणेवाडी शाखाध्यक्ष एकनाथ सादळकर, कार्याध्यक्ष सुभाष खोत, मानकापूरचे रमेश मोरे, कारदगा झेडपी अध्यक्ष बबन जामदार, निपाणीचे सर्जेराव हेगडे, निपाणी तालुका अध्यक्ष नितीन कानडे, चिनू कुळवमोडे सुळगाव, महादेव शेळके, दामोदर कांबळे, चंदू सुतार सुळगाव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.