केक कापून केला ख्रिसमस : विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी नाताळ सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना व मार्गदर्शन झाले. तर विविध शाळांमध्ये लहान मुलांनी येशू, सांताक्लॉजसह विविध प्रकारच्या वेशभूषा करून ख्रिसमस साजरा केला. याशिवाय ख्रिसमस ट्री, चॉकलेट, केक आणि विविध साहित्याचे वाटप झाले.
येथील विद्यासंवर्धक मंडळ संचलित सीबीएससी शाळेमध्ये प्राचार्य मनीषा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ख्रिसमस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रियांका गिंडे, श्रीदेवी दोडगौड, दिव्या नागावकर, विजय मगदूम, अर्जुन बुरली, रश्मी सदलगे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सण साजरा करण्यात आला. प्राचार्या ज्योती हारदी यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनपटाची माहिती दिली. यावेळी महानंदा भक्कनावर, नंदिनी पाटील, बबीता देसाई, सन्मती पाटील, भाग्यरेखा खटावकर, प्राची शहा यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्राचार्य चेतना चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली नाताळ सण साजरा झाला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. यावेळी केक कापून हा सण साजरा झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊची वाटप झाले. संस्थेचे सेक्रेटरी अमर चौगुले यांनी नाताळ बाबत माहिती दिली. यावेळी अर्पिता कुलकर्णी, ज्योती चवई, स्वाती पठाडे, नाजनीन होसुरी, किरण माने, मारुती महाजन, निकिता ऐवाळे, पूजा वसेदार, शिल्पा तराळ, भाग्यश्री शिंदे, साधना रोड्डनावर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.