मुख्याध्यापक जाधव :दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा
निपाणी (वार्ता) : कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या श्रमाचा परिहार करते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांमधील कलांना जपले पाहिजे. पालकांनीही मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये पद्मभूषण दिवंगत देवचंदजी शाह यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाश शाह होते.
स्पर्धेतील पहिली- दुसरी गटात नित्यश्री मगदूम, आराध्या सुतार, परीक्षिता जमदाडे, तिसरी -चौथी गटातबुशरा खान, निधी जाधव, भूमी कोडीग्रे, पाचवी- सातवी गटात कर्तव्य कुराडे, शिवानी बोते, नवोदय पाटील, आठवी- दहावी गटात आदिती कांबळे, रेणुका सावंत, सनी मुल्ला या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकावले.
परीक्षक म्हणून निपाणीतील चित्रकार गणेश जाधव यांनी काम पाहिले.
त्यावेळी मराठी कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक एस. के. कांबळे, किरणभाई शाह विद्यानिकेतन मुख्याध्यापक एस. टी. यादव, जेष्ठ शिक्षिक एस. एम. गोडबोले, आर. एस. भोसले, शिक्षक प्रतिनिधी एस. एस. सांडगे, कर्मचारी प्रतिनिधी एस. के. कांबळे उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्याना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. प्रतिभाभाभी शाह, डॉ. तृप्तीभाभी शहा यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन लाभले. यु. एम. सातपुते यांनी सूत्रसंचालन केले तर एस. बी. पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.