कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा भरवण्यात यावा यासाठी व्यापारी, नागरिक, महिला शेतकरी यांच्या वतीने ग्राम पंचायत अध्यक्षा छाया पाटील यांच्याकडे निवेदन दिले.
या निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन पासून मुस्लिम गल्ली दरम्यान बाजार भरत आहे. पण सध्या व्यापाऱ्यांची व खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिक महिलांची गर्दी होत आहे. व्यापार करणे अवघड झाले आहे. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी व महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे प्रकार वाढले आहेत. भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा शुक्रवारी आठवडी बाजार भरवण्यात यावा अशी मागणी यामध्ये केली आहे.
यावेळी बोलताना छाया पाटील म्हणाल्या, व्यापारी शेतकरी यांनी दिलेले निवेदन आपण स्वीकारले असून ग्रामपंचायत सदस्य व वरिष्ठ नेते मंडळी यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल.
यावेळी आप्पासाहेब पाटील, मुकुंद वठारे, महेश कोळी, राजू चव्हाण, राजू शेख, अरमान किल्लेदार, रुपेश खोत, साहिल मुल्ला, युवराज गाडेकर, सुनील गुरव, चिन्मय पाटील, प्रणील जाधव, करण जाधव, रामदास भादोले, प्रसाद शिंदे, महेश संकेश्वरे, महेश सोळांकुरे, कुमार कागले, राजू माळी यांच्यासह अन्य व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.